India Longest Expressway : भारतात गेल्या काही वर्षांपासून रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. देशातील शहरा शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मोठमोठे महामार्ग तयार केले जात आहेत.
आपल्या राज्यातही वेगवेगळ्या महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यासाठी हालचाली वाढत आहेत.
पण तुम्हाला भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता, याविषयी माहिती आहे का ? कदाचित तुम्हाला माहिती नसेल, यामुळे आज आपण भारतातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हा महामार्ग देशातील कोणत्या शहरांमधून जातो आणि याची लांबी किती आहे याबाबत डिटेल माहिती पाहणार आहोत.
भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता ?
भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग नॅशनल हायवे 44 हा आहे. NH 44 हा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग असून याची एकूण लांबी 3000 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. या महामार्गाची सुरुवात श्रीनगर येथून होते आणि हा महामार्ग कन्याकुमारीपर्यंत जातो.
म्हणजेच देशातील सर्वात लांबीचा महामार्ग कन्याकुमारी ते श्रीनगर दरम्यान विकसित करण्यात आला आहे. याची एकूण लांबी 3745 किलोमीटर एवढा असून हा एक राष्ट्रीय महामार्ग आहे.
भारताच्या उत्तर भागापासून ते दक्षिण भागापर्यंत जेवढी महत्त्वाची शहरे आहेत तेवढी शहरे या महामार्गाने जोडली गेले आहेत. देशातील 21 महत्त्वाच्या शहरांमधून हा महामार्ग जातो.
श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, लुधियाना, अंबाला, कर्नाल, सोनीपत, दिल्ली, आग्रा, ग्वालियर, झांसी, नागपूर, हैदराबाद, बंगलोर, धर्मपुरी, सेलम, करूर, मदुराई, तिरूनेलवेली आणि कन्याकुमारी या 21 महत्त्वाच्या शहरांमधून हा महामार्ग जातो.
सात जुने राष्ट्रीय महामार्ग या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाली आहेत. नॅशनल हायवे 44 ला आधी नॅशनल हायवे 7 या नावाने ओळखले जात होते.