Travel Tips : फॅमिली किंवा मित्रमैत्रिणींसोबत लाँग ड्राईव्हवर जाण्याची मजा काही वेगळीच असते. हवामान आल्हाददायक असले की प्रवासाची मजा द्विगुणित होते. अशातच आम्ही तुमच्यासाठी काही ठिकाणे घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही लाँग ड्राईव्हवर जाण्याचा प्लान आखू शकता.
दिल्ली ते स्पिती व्हॅली-तुम्ही दिल्ली ते स्पिती व्हॅली लाँग ड्राईव्हवर देखील जाऊ शकता. तुम्हाला येथील शांत वातावरण, तलाव, मठ आणि स्वादिष्ट भोजन आवडेल. हे उत्तर भारतातील पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
तुम्ही ईशान्य भारतातील शिलाँग ते चेरापुंजी या रस्त्याच्या सहलीचे नियोजन करू शकता. येथे रिमझिम पाऊस, ढगांनी आच्छादलेले पर्वत, लेणी आणि धबधब्यांची भव्य दृश्ये तुम्हाला भुरळ घालतील.
तुम्ही जयपूर ते जैसलमेर लाँग ड्राईव्ह प्लॅन करू शकता. गुलाबी शहरापासून ते गोल्डन सिटीपर्यंत, तुम्हाला अनेक सुंदर दृश्यांचा आनंद घेता येईल. याच्या मदतीने तुम्हाला राजस्थानची संस्कृती आणि परंपरा अगदी जवळून पाहता येणार आहे.
चेन्नईहून पुडुचेरीलाही जाता येते. तुम्ही दक्षिण भारतातील या रोड ट्रिपचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल. समुद्रकिनाऱ्याची सुंदर दृश्ये तुम्हाला भुरळ घालतील. तसेच नारळाच्या झाडांच्या रांगा आणि थंडगार वाऱ्याची झुळूक तुम्हाला एक सुखद अनुभव देईल.