Post Office RD Scheme : आपल्यापैकी अनेक जण संसाराच्या गरजा भागवून उरलेला पैसा कुठे ना कुठे गुंतवतात.

गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्या देशात उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस अन एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, बँकेची एफडी योजना याव्यतिरिक्त सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण देखील अलीकडील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

खरे तर सोने हे गुंतवणुकीचे फार जुने माध्यम आहे असे म्हटले तरी काय वावगे ठरणार नाही. सोन्याला हिंदू सनातन धर्मात मोठ महत्व आहे. सणासुदीच्या दिवसात जसे की दिवाळी, विजयादशमी, गुढीपाडवा अक्षय तृतीया अशा सणाला सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते.

या सणाच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची परंपरा हिंदू सनातन धर्मात आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण फार पूर्वीपासून अधिक आहे.

सोन्यासोबतच गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या आरडी योजनेत देखील मोठ्या प्रमाणात पैसे ठेवले जातात. अशा परिस्थितीत आज आपण पोस्ट ऑफिस मध्ये आरडी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

आज आपण जर पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये प्रति महिना दहा हजार रुपये असे पाच वर्षांसाठी गुंतवलेत तर या योजनेतून गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

सध्या पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या आरडी योजनेसाठी 6.7% एवढे व्याज दिले जात आहे. म्हणजेच या योजनेतून वार्षिक 6.7% एवढे रिटर्न मिळणार आहेत. योजनेची एक विशेषता म्हणजे येथे चक्रवाढ व्याजेचा फायदा मिळतोय.

पण चक्रवाढ व्याज तिमाही आधारावर लागू होते. या स्कीम मध्ये किमान 100 रुपये महिन्यापासून गुंतवणूक केली जाऊ शकते.

कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाहीये. म्हणजेच गुंतवणूकदाराला जेवढे पैसे गुंतवायचे असतील तेवढे पैसे तो या योजनेत गुंतवू शकतो.

विशेष म्हणजे या स्कीम मध्ये एक व्यक्ती त्याला हवे तेवढे खाते ओपन करू शकतो. या स्कीम मध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर पाच वर्षांनी सदर खाते मॅच्यूअर होते.

विशेष म्हणजे पाच वर्षांनी हे खाते परिपक्व झाल्यानंतर अर्ज करून आणखी पाच वर्षांसाठी हे खाते सुरू ठेवले जाऊ शकते.

आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया. जर तुम्ही या योजनेत प्रति महिना दहा हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षात तुमची गुंतवणुकीची अमाउंट सहा लाख रुपये एवढी होणार आहे.

एवढे सहा लाख रुपये गुंतवल्यानंतर तुम्हाला 6.7 टक्के व्याजदराने एक लाख 13 हजार 659 रुपये व्याज म्हणून मिळणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *