Hyundai New Car : ह्युंदाई ही एक लोकप्रिय कार निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या भारतात अनेक गाड्या लाँच झाल्या आहेत. कंपनीची ग्राहक संख्या विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान ह्युंदाई कंपनीने एक नवीन कार लॉन्च केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या लोकप्रिय कारच्या फेसलिफ्ट वर्जनचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने i20 फेसलिफ्ट या पॉप्युलर कारचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. i20 Sportz (O) ट्रिम हे नवीन व्हेरिएंट लॉंच करण्यात आले आहे.
या नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या व्हेरिएंटमध्ये अनेक हायटेक सेफ्टी फीचर्स अपलोड करण्यात आले आहेत. यामुळे ही गाडी ग्राहकांना विशेष लुभावणार असल्याचे बोलले जात आहे.
तथापि या गाडीची किंमत i20 फेसलिफ्टच्या इतर व्हर्जन पेक्षा थोडीशी अधिक राहणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे फिचर्स आणि किंमत अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
6 एअरबॅग, सनरूफसारखे फिचर्स
ह्युंदाईच्या नव्याने लॉन्च केलेल्या मॉडेलमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतील. या मॉडेलमध्ये वायरलेस चार्जरसह सिंगल-पेन सनरूफ देखील कंपनीकडून ऑफर केले जात आहे. दुसरीकडे, नव्याने लाँच झालेल्या Hyundai 120 Sportz (0) मध्ये हाय ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल आणि रियर पार्किंग कॅमेरा यांसारखी ॲडव्हान्स फीचर्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. यामुळे ही कार ग्राहकांना नक्कीच आवडेल असा विश्वास कंपनीला.
याशिवाय, या नवीन प्रकारात 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील आहे. त्याच वेळी, सुरक्षेसाठी, Hyundai i20 Sportz (0) मध्ये 6-एअरबॅग्ज, ABS, EBD आणि हिल-स्टार्ट सारखे हाय रेटेड फीचर्स देण्यात आले आहेत. जे की ही गाडीला अजूनच सुरक्षित आणि मजबूत बनवत आहेत.
गाडीच इंजिन कसं राहणार ?
आता आपण या गाडीचे इंजिन नेमकं कसं आहे याविषयी थोडक्यात पाहणार आहोत. Hyundai 120 Sportz (0) 1.2-लीटर Kappa पेट्रोल इंजिनवर आधारित राहणार अशी माहिती समोर आली आहे. नव्याने लॉन्च झालेल्या कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडले गेले आहे.
हे इंजिन मॅन्युअलसह पेअर केल्यावर जास्तीत जास्त 83bhp आणि CVT व्हेरियंटसह 88bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच कंपनीची ही एक जबरदस्त सेफ्टी फीचर्स असलेली आणि दमदार इंजिनवाली कार बनणार आहे.
किंमत किती राहणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, नव्याने लॉन्च झालेल्या Hyundai 120 Sportz (0) या मॉडेलची किंमत बेस स्पोर्ट्स प्रेमापेक्षा 35 हजार रुपयांनी अधिक राहणार आहे. या गाडीच्या मोनोटोन मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.73 लाख एवढी राहील. तसेच ड्युअल टोन मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.88 लाख एवढी राहणार आहे.