Hyundai 7 Seater MPV : ह्युंदाई दरवर्षी आपल्या अनेक कार्स लाँच करत असते. लवकरच ही कंपनी Xeter नावाची नवीन मायक्रो एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अशातच आता कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण कंपनी मायक्रो एसयूव्ही नंतर MPV सेगमेंटमध्ये आपली नवीन MPV लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाँच झाल्यानंतर कंपनीची ही कार Maruti Ertiga फेसलिफ्ट आणि Kia Carens तसेच आगामी Citroën C3 Aircross ला टक्कर देताना दिसेल. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम कार आहे.
असणार ही खासियत
कंपनीची आगामी MPV Stargazer Kia Carens सह SP2 प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. तसेच कंपनीची Hyundai Creta 5 सीटर आणि Alcazar 6 सीटर SUV या फ्लॅटफॉर्मवर आधारित असून ४.५ मीटर लांब स्टारगेझरचा व्हीलबेस २.७९ मीटर इतका असणार आहे.
कसा असेल लूक ?
जर कंपनीच्या आगामी Hyundai Stargazer च्या लुक आणि फीचर्सबाबत बोलायचे झाले तर, यात शक्तिशाली दिसणारी ग्रिल, स्प्लिट हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि स्लोपिंग रूफलाइन दिले जाणार आहे. तसेच शार्क फिन अँटेनासह इतर बाह्य फीचर्स तुम्हाला दिसतील.
तर दुसरीकडे, फीचर्सच्या बाबतीत, यात अँड्रॉइड ऑटो,वायरलेस चार्जर, ब्लूलिंक कनेक्टेड कार तंत्रज्ञान, प्रगत चालक सहाय्य प्रणाली, ऍपल कार प्ले सपोर्ट, हवेशीर सीट, एकाधिक एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा तसेच सेन्सर्ससह एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी अनेक फीचर्स मिळणार आहे.
असे असेल इंजिन आणि पॉवर
1.5-लिटर 4-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह, या कारमध्ये 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिसेल, जे 113bhp पॉवर आणि 250Nm पिकअप टॉर्क जनरेट करेल. जी 6-स्पीड मॅन्युअल तसेच CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह ऑफर करण्यात येईल.