SBI Bank FD : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. देशात एकूण 12 सरकारी बँका असून यामध्ये एसबीआय ही बँक सर्वात मोठी आहे.

या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. एवढेच नाही तर बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर देखील चांगला परतावा देत आहे. यामुळे अनेकांनी एसबीआय बँकेत एफडी केलेली आहे. विशेष म्हणजे अनेकजण एसबीआय बँकेत आगामी काळात एफडी करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात एसबीआय बँकेत एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण की, आज आपण एसबीआय बँकेच्या एका विशेष एफडी योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण एसबीआय बँकेच्या पाच वर्षांच्या टॅक्स सेविंग एफडी बाबत सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. या एफडी वर ग्राहकांना किती व्याज दिले जात आहे ? या एफडीमध्ये दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

एसबीआय बँकेचे एफडीचे व्याजदर खालील प्रमाणे

एसबीआय बँक दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याज देत आहे. तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी या कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.75 आणि जेष्ठ नागरिकांना 7.25 एवढे व्याज मिळत आहे. तसेच पाच वर्ष ते दहा वर्ष कालावधीच्या एफडीवर एसबीआय बँकेकडून सामान्य ग्राहकांना 6.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याज दिले जात आहे.

5 वर्षाच्या एफडीमध्ये 10 लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार

एसबीआय बँकेच्या 5 वर्षांच्या एफडी मध्ये एखाद्या ग्राहकाने दहा लाख रुपये गुंतवले तर त्याला 13 लाख 80 हजार 420 रुपये मिळणार आहेत. म्हणजे मॅच्युरिटी वर सदर ग्राहकाला तीन लाख 80 हजार 420 रुपये व्याज स्वरूपात मिळणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *