Home Guard Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

वाढत्या बेरोजगारीमुळे देशात सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच, मात्र बेरोजगार नवयुवक तरुणांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे होमगार्ड पदासाठी एक मोठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

डायरेक्ट्रेट जनरल ऑफ होम गार्ड्स, गवर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली यांच्या माध्यमातून होमगार्ड पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे या भरतीची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे.

तसेच या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता आपण या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या अन किती पदांसाठी होणार भरती

या भरतीच्या माध्यमातून होमगार्ड पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार होम गार्ड पदाच्या तब्बल दहा हजार रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

होमगार्ड पदासाठी किमान बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच दहावी पास एक्स ससर्विसमॅन आणि एक्स सीएपीएफ उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र राहणार आहेत. तथापि उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या भरतीसाठी 20 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.

अर्ज कसा करावा लागणार

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. http://dghgenrollment.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक अन पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

निवड प्रक्रिया कशी राहणार ?

या भरती प्रक्रिया अंतर्गत लेखी परीक्षा, फिजिकल आणि मेजरमेंट टेस्ट घेतली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *