HDFC Home Loan : आपल्यापैकी अनेकांचे घराचे स्वप्न असेल. काही लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक अजूनही या स्वप्नांसाठी झगडत असतील. दरम्यान घराचे स्वप्न पाहणारे अनेकजण होम लोन घेऊन स्वप्न पूर्तता करतात.
जर तुम्हीही होम लोन घेऊन स्वप्नातील घर उभारू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी 50 हजार रुपये पगार असलेल्या पगारदारांना किती लाखाचे होम लोन देऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर एचडीएफसी बँक स्वस्त व्याजदरात गृह कर्ज पुरवत आहे. या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. ही बँक स्वस्त व्याज दरात कर्ज पुरवते.
होम लोन देखील बँकेच्या माध्यमातून स्वस्त व्याजदरात उपलब्ध करून दिले जात आहे. खरे तर अनेक लोक आपल्या उत्पन्नानुसार लोन एलिजिबिलिटी चेक न करता फ्लॅट बुक करतात. मात्र नंतर अशा लोकांना बँकेच्या माध्यमातून कमी उत्पन्नामुळे होम लोन नाकारले जाते.
त्यामुळे अशा गोष्टी घडून आहेत यासाठी सर्वप्रथम लोन एलिजिबिलिटी चेक करणे आवश्यक असते. तुमच्या उत्पन्नानुसार बँक तुम्हाला किती लाखाचे होम लोन देऊ शकते हे आधी माहिती करून घेणे आवश्यक असते.
एकदा की तुम्हाला बँकेच्या माध्यमातून अंदाजित किती लाखांचे होम लोन मंजूर होऊ शकते हे समजले की मग फ्लॅट बुक केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात होम लोन साठी भटकंती करावी लागणार नाही.
दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या होम लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटरनुसार पगाराच्या आधारावर किती होम लोन मंजूर होऊ शकते हे समजून घेणार आहोत.
सदर कॅल्क्युलेटर नुसार जर एखाद्याला 50 हजार रुपयांचा पगार असेल तर अशा व्यक्तीला एचडीएफसी बँकेकडून 25 लाख 92 हजार 694 रुपयांचे होम लोन मंजूर होऊ शकते.
ही होम लोन ची कमाल मर्यादा आहे यापेक्षा कमी होम लोन देखील मंजूर होऊ शकते. जर समजा एवढे होम लोन मंजूर झाले तर या कर्जाच्या परतफेडीसाठी 22,500 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.