Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नगरीमधील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. खरंतर पुणे ते जळगाव आणि जळगाव ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.

मात्र, सध्या स्थितीला या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करायचा झाल्यास रेल्वे मार्गाने किंवा रस्ते मार्गाने प्रवास करावा लागतोय. पण, लवकरच या दोन्ही शहरा दरम्यान विमानाने प्रवास करता येणार आहे. जळगाव ते पुणे दरम्यान नवीन विमानसेवा सुरू होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.

यामुळे या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या विमानसेवेमुळे पुणे ते जळगाव हा प्रवास खूपच जलद होईल अशी आशा आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, खानदेशरत्न जळगाव येथून सध्या स्थितीला गोवा आणि हैदराबाद साठी विमान सेवा सुरू आहे. या विमानसेवेमुळे जळगाव ते गोवा आणि जळगाव ते हैदराबाद हा प्रवास वेगवान झाला असून प्रवाशांच्या माध्यमातून या विमानसेवेला अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला जात आहे.

यामुळे गदगद झालेल्या विमान कंपनीच्या माध्यमातून जळगाव ते पुणे विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. फ्लाय 91 या एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून जळगाव ते पुणे यादरम्यान विमान सेवा सुरू केली जाणार आहे. खरे तर ही एअरलाइन्स कंपनी मे महिन्याच्या अखेरीस विमानसेवा सुरू करणार असे म्हटले जात होते.

मात्र आता हा मुहूर्त थोडा लांबणीवर गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव ते पुणे यादरम्यान फ्लाय 91 या एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून जून महिन्यात विमानसेवा सुरू केली जाणार आहे. 10 जून ते 15 जून या कालावधीमध्ये कधीही ही विमानसेवा सुरू होणार असे म्हटले जात आहे. 25 मे पर्यंत ही विमान सेवा सुरू करण्याचे कंपनीचे प्रयत्न होते.

मात्र आता यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली असून पुढील महिन्यात दहा जून ते 15 जून या कालावधीमध्ये ही विमानसेवा सुरू होणार अशी माहिती कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या सदर विमान कंपनीला या विमानसेवेसाठी पुणे या सैन्य दलाच्या ताब्यात असलेल्या विमानतळाकडून परवानगी सुद्धा मिळाली आहे. मात्र, कंपनीला विमानसेवेचे वेळापत्रक प्राप्त होऊ शकलेले नाही.

तसेच, कंपनीकडून पुणे विमानतळावर मनुष्यबळाची नेमणूक देखील बाकी आहे. परंतु हे काम लवकरच होणार आहे. तसेच या विमानसेवेचे वेळापत्रक देखील लवकरात लवकर कंपनीला मिळणार आहे.

यामुळे ही विमान सेवा पुढील महिन्यात कोणत्याही परिस्थितीत सुरु होणार असे बोलले जात आहे. निश्चितच ही विमान सेवा सुरू झाल्यास या दोन्ही शहरातील विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *