Pune Local News : पुणे शहरातील लोकल प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर, पुण्यात पुणे ते लोणावळा या मार्गावर लोकल सुरू आहे. या लोकल सेवेमुळे या मार्गावरील प्रवास जलद झाला आहे. दरम्यान याच लोकल सेवे संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे या मार्गावरील लोकलच्या फेऱ्या आता वाढल्या आहेत. खरे तर कोरोना येण्यापूर्वी या मार्गावर दुपारी देखील लोकल चालवली जात होती. परंतु कोरोनाच्या सावट आले आणि भारतातील विविध मार्गावरील रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्यात. त्यावेळी पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलला देखील फुलस्टॉप लावण्यात आला.
मात्र जेव्हा कोरोनाचे सावट पूर्णपणे नाहीसे झाले तेव्हा या मार्गावर पुन्हा एकदा लोकल सुरू झाली. परंतु दुपारच्या काळात बंद करण्यात आलेली लोकल सुरू झाली नाही. यामुळे तेव्हापासून या मार्गावर दुपारच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी या मार्गावर कामगार वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात.
अशा परिस्थितीत दुपारची बंद झालेली लोकल सेवा पुन्हा सुरू झाली पाहिजे अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून लावून धरण्यात आली होती. या मागणीसाठी नागरिक आक्रमक देखील बनले होते. या मार्गावरील प्रवाशांनी दुपारच्या वेळी देखील लोकल सुरू झाली पाहिजे या मुख्य मागणीसाठी मागील आठवड्यात डेक्कन क्वीन एक्सप्रेस अडवली होती.
यानंतर मग रेल्वे विभागाने पुणे ते लोणावळा दरम्यान पुन्हा एकदा दुपारच्या वेळी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पासून अर्थातच 15 जानेवारी 2024 पासून या मार्गावर आता दुपारी देखील लोकल धावणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेल्या शंकाच नाही.
दरम्यान आता आपण दुपारच्या लोकल सेवेचे वेळापत्रक कसे राहणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार लोकल सेवेचे दुपारचे वेळापत्रक ?
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून शिवाजीनगर स्थानकावरून दुपारी 12.05 वाजता लोकल सुटणार आहे आणि दुपारी 01.20 मिनिटांनी लोणावळा स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच लोणावळा रेल्वे स्थानकावरून लोकल सकाळी साडे अकरा वाजता लोकल सुटणार आहे आणि ही लोकल दुपारी 12.45 वाजता शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.