Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि आता रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीवर आता नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने देशातील विविध महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये पुणे ते इंदोर या महत्त्वाच्या मार्गावर देखील उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर रेल्वे प्रशासनाने 14 साप्ताहिक चालवण्याचा मोठा निर्णय घेतला असून यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या अतिरिक्त गाड्यांमुळे निश्चितच रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान आज आपण या गाडी संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-इंदूर उन्हाळी विशेष गाडी आठवड्यातून एकदा चालवली जाणार आहे. ही गाडी तर शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी सकाळी पाच वाजता इंदूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी इंदूर येथे पोहोचणार आहे. तसेच इंदुर येथून ही गाडी सकाळी 11 वाजता निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी सव्वातीन वाजेच्या आसपास पुणे रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे.
कुठं राहणार थांबा?
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, ही गाडी लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, वलसाड, सूरत, वडोदरा, गोधरा, रतलाम, नागदा, उज्जैन, देवास या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
निश्चितच या उन्हाळी विशेष गाड्यामुळे पुणे इंदोर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरं पाहता उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटन स्थळाकडे धाव घेत असतात आणि विद्यार्थी आपल्या गावाकडे रवाना होतात. त्यामुळे रेल्वेमध्ये नेहमीपेक्षा अधिक गर्दी पाहायला मिळते. अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी विशेष गाड्या सुरू केल्या जातात. यंदा देखील रेल्वे प्रशासनाने उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.