Royal Enfield Bike : रॉयल एनफिल्ड बुलेट ही एक लोकप्रिय बाईक आहे. बुलेटचे अनेकजण चाहते आहेत. तरुणांमध्ये ही गाडी खूपच लोकप्रिय आहे.
दरम्यान जर तुम्हीही रॉयल एनफिल्डची बुलेट खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गोड बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे कंपनीने एक नवीन बाईक लॉन्च केली आहे. यामुळे ग्राहकांना आता रॉयल एनफिल्डच्या बाईक खरेदीसाठी एक नवीन विकल्प उपलब्ध होणार आहे.
रॉयल एनफिल्डच्या पोर्टफोलिओ यामुळे आणखी स्ट्रॉंग होणार आहे. खरेतर, रॉयल इन्फिल्ड कंपनीने बुलेट 350 एका नवीन रंगात लॉन्च केली आहे.
ही मोटरसायकल आता नवीन मिलिटरी सिल्व्हरब्लॅक आणि मिलिटरी सिल्व्हररेड रंगात उपलब्ध होणार आहे.
अर्थातच ग्राहकांना आता बुलेट 350 आणखी काही कलर ऑप्शन मध्ये मिळणार आहे. दरम्यान कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन रंगाची झलक मोटारसायकलच्या इंधन टाकीवर पाहायला मिळणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या नवीन रंगाच्या बुलेटची किंमत किती राहणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
खरेतर हे नवीन वॅरीयंट मिलिटरी आणि स्टॅण्डर्ड मॉडेल दरम्यान ठेवण्यात आले आहे. म्हणजेच आता बुलेट 350 मिलिटरी, बुलेट मिलिटरी सिल्व्हर, बुलेट स्टँडर्ड आणि बुलेट ब्लॅक गोल्ड या चार भिन्न प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नवीनतम मिलिटरी सिल्व्हरब्लॅक आणि मिलिटरी सिल्व्हररेड प्रकार सिंगल-चॅनल ABS आणि मागील ड्रम ब्रेकसह उपलब्ध करून देण्यात आली आहे.
म्हणजेच आता या गाडीत ग्राहकांना स्टायलिश लूक तर मिळणारच आहे शिवाय मजबूत सुरक्षा देखील मिळणार आहे.
दरम्यान या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही गाडी एक लाख 79 हजार रुपये एक्स शोरूम किमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
एकंदरीत रॉयल एनफिल्ड कंपनीने बुलेट 350 आता नवीन कलर ऑप्शन मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याने याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल आणि ग्राहकांना आता वेगवेगळ्या कलरची रेंज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यामुळे बुलेटची विक्री आणखी वाढेल अशी आशा आहे.