Gold Price Today : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या दारात देखील वाढत आहे.
मागील वर्षात 2023 मध्ये सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. आता नवीन वर्ष 2024 मधील सोन्या चांदीच्या किमती देखील जाहीर झाल्या आहेत.
सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 63,060 रुपये आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी सोन्याने 64,063 रुपये प्रति 10 ग्रॅम हा उच्चांक गाठला होता. 2024 मध्ये देखील सोन्याच्या दरात वाढ कायम राहिली आहे.
सोने आणि चांदीच्या बाजारात 2024 मध्ये मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज सोने आणि चांदी बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 2023 मध्ये सोन्याने 15 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 2024 मध्ये सोन्याचा भाव 70,000 रुपयांच्या पुढे जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
2024 मध्ये सोन्याचा भाव तेजीत राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक चांगली ठरू शकते. रुपयाची स्थिरता, भू-राजकीय अनिश्चितता अशी अनके कारणे सोन्याचे दर वाढवण्यास कारणीभूत ठरतील असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
MCX वर आजचा सोन्याचा दर 63,060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. सोने आणि चांदीच्या दारात अनेकवेळा प्रचंड चढ उतार पाहायला मिळाला आहे. येत्या काळात सोने 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते.
सोने दरवाढीवर जागतिक तणावाचा परिणाम
रशियन-युक्रेन युद्ध, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील वाढता दबाव यामुळे सोन्याचा दारात प्रचंड वाढ होत आहे. येत्या काळात जर असेच सुरु राहिले तर सोन्याचे भाव गगनाला भिडू शकतात.
IMF च्या मते मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात सतत वाढ केल्याने जागतिक आर्थिक वाढ मंद होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे अधिक आकर्षक होत आहेत.
त्यामुळे देखील सोन्याच्या दारात वाढ होत आहे. येत्या काळात सोन्याचे दर वाढणार असल्याने सोन्यामधील गुंतवणूक फायद्याची ठरणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.