Goa Best Tourist Destination : गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरंतर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जण सहलीसाठी बाहेर पडत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काहींनी गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवला असेल.
दरवर्षी उन्हाळ्यात गोव्याला जाणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदा देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्याला गर्दी करणार आहेत. गोवा हे एक जागतिक पिकनिक स्पॉट आहे. येथे जगभरातील पर्यटक गर्दी करतात.
जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात गोव्याला जाणार असाल, उन्हाळ्यात गोवा ट्रिप आयोजित करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी गोव्यातील अशा काही ऑफ बीट ठिकाणांची माहिती सांगणार आहोत जी ठिकाणे तुम्ही या आधी कधीच पाहिली नसतील. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
चोरला घाट : जर तुम्हाला शांत आणि निवांत वातावरण हवे असेल तर गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. येथे तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत किंवा फॅमिली समवेत चांगला कॉलिटी टाईम स्पेंड करू शकता. चोरला घाट हे एक सुंदर असे हिल स्टेशन आहे. येथील विलोभनीय दृश्य तुमच्या ट्रिपची रंगत वाढवणार आहेत.
अर्वालेम फॉल्स : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात गोव्याला गेला तर येथील संकेलिम या सुंदर गावात वसलेले, अर्वालेम फॉल्सला भेट द्यायला विसरू नका. येथे गेल्यावर तुम्हाला मंत्रमुग्ध करणारे दृश्य पाहायला मिळणार आहे. हा धबधबा पाहण्यासाठी नेहमीच या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते.
असं म्हणतात की हा धबधबा 50 मीटर उंचीवरून पडतो. जर तुम्हाला निसर्गाची सुंदरता पाहायची असेल तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या. येथील नयनरम्य दृश्य तुम्हाला नक्कीच आनंद देणार आहेत.
दिवार बेट : दिवार बेट हे गोव्यातील एक लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे. हे ठिकाण खूपच सुंदर आहे मात्र अजूनही अनेकांना याबाबत माहिती नाहीये. यामुळे जर तुम्ही कधी गोव्याला ट्रिप काढली तर इथे नक्कीच भेट द्या. येथे गेलात तर तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळणार आहे. मांडोवी नदीत वसलेले हे बेट नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय बनत चालले आहे.