FDA Recruitment 2023 : मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाआंतर्गत भरती सुरु आहे. यासाठी भरती सूचना देखील जाहीर केली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2023 आहे. ही भरती अन्न सुरक्षा अधिकारी पदांसाठी होणार असून उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावेत.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट

पदाचे नाव – ही भरती अन्न सुरक्षा अधिकारी (गट-ब) पदांसाठी होणार आहे.
रिक्त पदे – या भरती अंतर्गत एकूण 189 पदे भरली जणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र रसायन किंवा शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट पदवी किंवा वैद्यकशास्त्र विषयातील पदवी.
अर्ज शुल्क – यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.
वेतन – याअंतर्गत निवड झाल्यास 41,800/- रुपये ते 1,32,300/- पर्यंत पगार मिळेल.
नोकरी ठिकाण – ही भरती मुंबई (महाराष्ट्र) येथे होत आहे.
अर्ज करण्याची पद्धत – यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, (औषधे-1 कार्यासन) 9 वा मजला, नवीन मंत्रालय., जी.टी. हॉस्पीटल कॉम्प्लेक्स संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400002.

असा करा अर्ज

-वरील पदभरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
-उमेदवार याकरिता पोस्टाने अर्ज करू शकतो.
-उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावेत. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *