FD Scheme : आजची ही बातमी एफडी करणाऱ्यांसाठी खूपचं खास राहणार आहे. विशेषता ज्यांना बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी आणि एसबीआय यापैकी कोणत्यातरी एका बँकेत एफडी करायची असेल त्यांच्यासाठी आजची बातमी विशेष महत्त्वाची राहील.

खरे तर अलीकडे बँकांच्या माध्यमातून FD म्हणजेच मुदत ठेवीसाठी चांगले व्याजदर पुरवले जात आहे. याचा परिणाम म्हणून आता गुंतवणुकीसाठी एफडी करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे हे वेगळे सांगायला नको.

मात्र अनेकांच्या माध्यमातून कोणत्या बँकेत FD केल्यास चांगला परतावा मिळू शकतो हा सवाल उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज आपण ज्येष्ठ नागरिकांनी बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी आणि एसबीआयच्या तीन वर्ष कालावधी असलेल्या एफडी मध्ये एक लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

त्यामुळे गुंतवणूकदारांना या देशातील प्रमुख तीन बँकांमधील एफडीच्या व्याजदराची तुलना करणे सोप होणार आहे. तसेच यापैकी कोणत्या बँकेत गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळेल याची माहिती त्यांना होऊ शकणार आहे.

बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा हि पब्लिक सेक्टर मधील एक मोठी बँक आहे. ही बँक देशातील इतर पब्लिक सेक्टर मधल्या बँकेच्या तुलनेत एफडीसाठी सीनियर सिटीजन अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर देत आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून तीन वर्षाच्या एफडी करिता 7.75 टक्के एवढे व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत या बँकेत जर तीन वर्षाच्या कालावधीसाठी एक लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीच्यावेळी गुंतवणूकदाराला एक लाख 26 हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे.

HDFC बँक : ही बँक खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असल्याचा दावा केला जातो. बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. ही बँक आपल्या एफडी ग्राहकांना चांगले व्याजदर देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बँक तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देत आहे. म्हणजे आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) : एसबीआय ही देशातील पब्लिक सेक्टरमधील अर्थातच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देते. म्हणजे या बँकेत जर तीन वर्षांच्या कालावधीसाठी कोणी एक लाख रुपयांची एफडी केली तर त्याला तीन वर्षांनी एक लाख 24 हजार रुपये मिळणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *