FD News : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी आणि पब्लिक सेक्टर मधील एसबीआय या बँकेच्या पाच वर्ष कालावधीच्या एफडी योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआय बँकेत पाच वर्ष कालावधीसाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार आणि एचडीएफसी या बँकेत पाच वर्ष कालावधीसाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
एचडीएफसी बँकेची पाच वर्ष कालावधीची एफडी योजना
HDFC बँक सामान्य ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर वार्षिक 7 टक्के व्याज देत आहे. तसेच या कालावधीच्या एफ डी साठी सीनियर सिटीजन ग्राहकांना 0.50 टक्के अधिकचे व्याजदर अर्थातच 7.50 टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू आहेत. अ
शा परिस्थितीत जर या प्रायव्हेट सेक्टरमधील बँकेत एखाद्या सामान्य ग्राहकाने 5 लाख रुपयांची एफडी केली तर त्याला मॅच्युरिटीवर 7,07,389 रुपये मिळतील.
म्हणजेच व्याज म्हणून 2,07,389 रुपये मिळणार आहेत. तसेच जर एखाद्या सीनियर सिटीजन ग्राहकाने या एफ डी योजनेत 5 लाख रुपये जमा केलेत तर सदर ग्राहकाला मॅच्युरिटीवर 7,24,974 रुपये मिळतील. म्हणजे 2,24,974 रुपये व्याज म्हणून सदर ग्राहकाला मिळणार आहेत.
एसबीआय बँकेची 5 वर्ष कालावधीची एफडी योजना
एसबीआय बँक आपल्या रेगुलर ग्राहकांना पाच वर्ष कालावधीच्या एफडी साठी 6.50% आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना एक टक्के अधिकचे म्हणजेच 7.50% एवढे व्याज देत आहे.
यानुसार जर एखाद्या रेगुलर ग्राहकाने 5 लाख रुपयांची एफडी केली तर त्याला मॅच्युरिटीवर 6,90,209 रुपये मिळतील. म्हणजेच व्याजाचे उत्पन्न 1,90,209 रुपये असेल.
दुसरीकडे एखाद्या सीनियर सिटीजन ग्राहकाने या एफ डी योजनेत 5 लाख रुपये जमा केलेत तर त्यांना परिपक्वतेवर 7,24,974 रुपये मिळतील. म्हणजे 2,24,974 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत.
कोणती एफडी योजना फायदेशीर
जर गुंतवणूकदार सिनियर सिटीजन असेल तर दोन्ही बँकांच्या एफडी योजना त्यांना सारखाच परतावा देणार आहेत. मात्र सामान्य ग्राहकांना एचडीएफसी बँकेची एफडी योजना अधिकचा परतावा देत आहे.
यामुळे गुंतवणूकदार आपल्या सोयीनुसार या दोन्ही बँकांपैकी कोणत्याही एका बँकेच्या पाच वर्ष कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करू शकतात.