FD Interest Rate : एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. याचे कारण म्हणजे आता भारतातील अनेक बड्या बँका एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना एफडीमधून चांगला परतावा मिळत आहे.

दरम्यान, आज आपण देशातील 5 अशा बड्या बँकांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्या दोन वर्षांच्या एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. यामुळे, जर तुम्ही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.

देशातील कोणत्या बँका देत आहेत एफडीवर सर्वाधिक व्याज

आरबीएल बँक : देशातील अनेक बँका एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. यामध्ये आरबीएल बँकेचा देखील समावेश होतो.

बँकेच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार बँकेकडून 2 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी करणाऱ्यांना 8 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर केले जात आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या बँकेच्या माध्यमातून आठ टक्क्यांपर्यंतचे व्याज दिले जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांना या बँकेच्या दोन वर्षाच्या एफडी योजनेतून चांगला परतावा मिळू शकणार आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक : मिळालेल्या माहितीनुसार, आरबीएल बँकेप्रमाणेच आयडीएफसी फर्स्ट बँक देखील आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देत आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक आपल्या ग्राहकांना दोन वर्षांच्या एफडी साठी 7.75 टक्के एवढे व्याज ऑफर करते. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना एफडी मधून चांगला परतावा या ठिकाणी मिळू शकणार आहे.

डीसीबी बँक : डीसीबी बँकेच्या माध्यमातून दोन वर्षांच्या एफडी साठी चांगले व्याज ऑफर केले जात आहे. बँकेकडून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दोन वर्षांच्या कालावधी मधील एफडी साठी 7.55% एवढ व्याज दिले जात आहे. यामुळे दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे.

इंडसइंड बँक : ही बँक दोन वर्षांच्या कालावधीसाठी एफडी करणाऱ्यांना 7.50% एवढे व्याज ऑफर करत आहे. यामुळे दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या एफ डी योजनेमधूनही चांगला परतावा मिळणार आहे.

येस बँक : येस बँक ही प्रायव्हेट सेक्टर मधील एक महत्त्वाची बँक आहे. ही बँक दोन वर्षांच्या कालावधीसाठीच्या FD करिता 7.25% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *