Famous Tourist Spot : वीकेंडला तुम्हीही फिरायला बाहेर निघणार आहात का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. कारण की आज आपण दुष्काळासाठी कुख्यात असलेल्या मराठवाड्यातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहोत. यामुळे जर तुम्ही वीकेंडला मराठवाड्यात फिरायला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.
मराठवाड्यातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे
छत्रपती संभाजीनगर शहर : या शहरात फिरण्यासारखे अनेक स्पॉट तुम्हाला पाहायला मिळतील. या शहराला दारांचे शहर म्हणून ओळखले जाते. छत्रपती संभाजी नगर हे शहर मराठवाड्यातील लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. या शहराचा इतिहास आणि येथील वास्तुकला पर्यटकांना खुणावत आहे.
जर तुम्हीही मराठवाडा एक्सप्लोर करण्यासाठी मुंबई, पुणे येथून मराठवाड्याकडे रवाना होत असाल तर सर्वप्रथम तुमची गाडी छत्रपती संभाजी नगर शहरात थांबवा. इथे गेल्यानंतर छत्रपती संभाजी नगर शहराची सुंदरता तुमच्या नजरेत कैद करा आणि मग पुढील पर्यटन स्थळाकडे मार्गस्थ व्हा.
अजिंठा आणि एलोरा लेणी : अजिंठा आणि एलोरा लेणी आर्थिक वारसा स्थळांपैकी एक आहे. जर तुम्ही मराठवाडा एक्सप्लोर करण्यासाठी जाल तर येथेही तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटकांचा लोंढा तुम्हाला पाहायला मिळेल.
देश विदेशातील हजारो पर्यटक येथे गर्दी करत असतात. जर तुम्हालाही ऐतिहासिक वास्तू आपल्या नजरेत कैद करायची असेल तर तुम्हीही या ठिकाणाला एकदा भेट दिलीच पाहिजे.
बीबी का मकबरा : हे ठिकाण छत्रपती संभाजी नगर शहरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे. ही वास्तू मुघलं वास्तुकलेचा नमुना आहे. जर तुम्हाला प्राचीन वास्तुकला पाहण्याचे आवड असेल तर येथे नक्कीच गेले पाहिजे.
दौलताबाद किल्ला : छत्रपती संभाजी नगर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. येथे दररोज हजारो पर्यटकांची वर्दळ तुम्हाला पाहायला मिळेल. ऐतिहासिक महत्त्व असलेला हा किल्ला देश-विदेशातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
घृष्णेश्वर देवालय : एलोरा लेण्यांपासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर हे प्राचीन मंदिर वसलेले आहे. या प्राचीन मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविक हजारोंच्या संख्येने गर्दी करत असतात. यामुळे जर तुम्हीही कधी मराठवाडा एक्सप्लोर करायला गेलात तर येथे जाऊन नक्कीच दर्शन घ्या.