Famous Tourist Spot : महाराष्ट्रात फिरण्यासाठी हजारो पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांवर दररोज हजारोंची गर्दी राहते. राज्यातील पर्यटन स्थळांवर 12 महिने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ पहायला मिळते.

दरम्यान जर तुम्हीही फेब्रुवारी महिनाअखेर एखाद्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच मोलाची ठरणार आहे.

कारण की आज आपण कर्जत मधील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहोत. कर्जत मध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील.

यापैकीच काही लोकप्रिय ठिकाणांची आज आपण माहिती पाहणार आहोत. यामुळे जर तुमचा फेब्रुवारी महिना अखेर कुठे बाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही यापैकी काही फेमस पर्यटन स्थळांचा तुमच्या ट्रिप मध्ये समावेश करू शकता.

कोंढाणा लेणी : जर तुम्हाला ऐतिहासिक वास्तू तसेच प्राचीन लेणी पाहण्याचा छंद असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर या लेणी आहेत.

उंच डोंगरात कोरलेल्या या बौद्धकालीन प्राचीन लेणी पर्यटकांमध्ये विशेष आकर्षणाचा विषय ठरलेल्या आहेत. राजमाची ट्रेकला जाणाऱ्या वाटेतच या लेणी पडतात. यामुळे जर तुम्हीही कुठे फिरायला निघणार असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.

पेठ किल्ला : तुम्हालाही महाराष्ट्राचे वैभव पाहायचे असेल, तुम्हालाही राज्यातील गडकोटांचा इतिहास जाणून घेण्याची आवड असेल तर तुम्ही कर्जत तालुक्यातील पेठ किल्ल्याला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.

असं म्हणतात की गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागतो. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर येथून तुम्हाला पेठ किल्ल्याच्या आजूबाजू असलेले विहंगम दृश्य टिपता येणार आहे.

भोर घाट : खोपोली आणि खंडाळा दरम्यान पसरलेला हा भोर घाट खूपच विहंगम आहे. येथील दृश्यमनाला खूपच प्रसन्नता देतात. जर तुम्हालाही तुमच्या रुटीन आयुष्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही येथे जाऊन तुमचा कॉलिटी टाइम्स स्पेंड करू शकता. जर तुम्हाला फेब्रुवारी महिना अखेर ट्रिप काढायची असेल तर सध्याचे गुलाबी थंडीचे वातावरण येथे जाण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.

कोथळीगड ट्रेक : कर्जत शहराच्या जवळच हा ट्रेकिंग पॉईंट आहे. कोथळी गडाचे वैभव शब्दात सांगता येणार नाही. येथील दृश्य तुमची ट्रिप खरोखरच मनोरंजक बनवणार आहेत. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणाला नक्कीच भेट दिली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही लोकल बस किंवा मग टॅक्सीने जाऊ शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *