Famous Tourist Spot In Konkan : कोकणाला मनमोहक सौंदर्य लाभलेले आहे. सुंदर ते आपले कोकण म्हणूनच पर्यटकांमध्ये लोकप्रिय बनले आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक कोकणाला भेटी देत असतात. कोकणाला लाभलेला अथांग समुद्रकिनारा आणि हिरवागार निसर्ग कोकणाची सुंदरता वाढवतो.

कोकणाची नैसर्गिक सौंदर्यता एवढी अधिक आहे की कोकण एक्सप्लोर करण्यासाठी फक्त देशातीलच नाही तर विदेशातीलही लाखो पर्यटक या ठिकाणी भेटी देतात.

खरे तर संपूर्ण कोकणच फिरण्यासारखा आहे. कोकणाचा सागरी किनारा, सागरी किनाऱ्यावर असलेल्या नारळाच्या उंच उंच बागा हे सारे काही नजरेत कैद करण्यासारखे आहे. कोकणात शेकडो प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

मात्र आज आपण काही मोजक्या पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण ज्या पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत ती पर्यटन स्थळे कोकणातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळे असून येथे दरवर्षी पर्यटकांचा लोंढा पाहायला मिळतो.

त्यामुळे जर तुम्हीही कोकण फिरण्याचा प्लॅन बनवलेला असेल, कोकणात ट्रिप काढलेली असेल तर या ठिकाणाला तुमच्या ट्रिपमध्ये नक्कीच समाविष्ट करा.

तारकर्ली बीच : मालवण मधला हा लोकप्रिय बीच पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथे हजारो पर्यटक दररोज येतात. जर तुम्हीही कोकण फिरण्याचा प्लॅन बनवलेला असेल तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. विशेष म्हणजे तारकर्ली पासून अगदी हाकेच्या अंतरावर सिंधुदुर्ग किल्ला देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवप्रभू यांनी बांधला आहे.

थिबा राजवाडा : हा राजवाडा ब्रिटिश कालीन आहे. ब्रिटिशांच्या काळात या राजवाडाची बांधणी पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला ऐतिहासिक वास्तू पाहण्याची आवड असेल तर हा राजवाडा तुम्ही एकदा नक्कीच एक्सप्लोर केला पाहिजे. कोकणातील नैसर्गिक सौंदर्य तर तुम्ही कधी ना कधी नक्कीच एक्सप्लोर केलेले असेल मात्र या वास्तूला भेट दिली तर तुम्हाला कोकणातील सौंदर्यतेचे व्यापक दृश्य पाहायला मिळणार आहे. हा राजवाडा रत्नागिरी मध्ये आहे.

धूतपापेश्वर मंदिर : परिवारासमवेत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत तुम्ही कोकण फिरायला गेलात तर या मंदिराला एकदा नक्कीच भेट द्या. राजापूर तालुक्यात असलेले हे मंदिर पुरातन आहे. इथला परिसर हा खूपच निसर्गरम्य असून सर्वत्र तुम्हाला भक्तिमय वातावरण पाहायला मिळेल. यामुळे कोकणात गेला तर तुमच्या ट्रिपमध्ये धार्मिक स्थळाचा अवश्य समावेश करा जेणेकरून तुमची ट्रिप परिपूर्ण होईल.

लोकमान्य टिळकांचे घर : महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक टिळक हे आपल्या कोकणातील होते. लोकमान्य टिळकांचे घर रत्नागिरी जिल्ह्यातील टिळक आळी येथे आहे. विशेष म्हणजे हे घर आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे ऐतिहासिक बरोबर असलेले हे घर नक्कीच एक्सप्लोर करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ट्रीप मधून काहीतरी बोध घेता येईल.

जंजिरा किल्ला : कोकणातील आणखी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. हा किल्ला समुद्राच्या अगदी मधोमध आहे. इथून तुम्हाला समुद्राचे मनमोहक दृश्य आपल्या नजरेत कैद करता येणार आहे. तसेच या किल्ल्याची बांधनुक देखील तुमचे मन मोहून घेणार आहे. हा किल्ला मुरुड गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर बसलेला आहे.

आरे वारे समुद्र किनारा : या ठिकाणी असणारी झिपलाईन पर्यटकांमध्ये खूपच आकर्षणाचा विषय ठरते. रत्नागिरी जवळचा हा समुद्रकिनारा एकदा तरी नक्कीच एक्सप्लोर केला पाहिजे. तुम्ही जर एकदा या ठिकाणी गेला तर वारंवार या ठिकाणाला भेट द्याल. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *