Famous Tourist Place Near Pune : विकेंड आला की, आपल्यापैकी अनेक बॅग पॅक करतात आणि फिरण्यासाठी बाहेर निघतात. कोणी परिवारासमवेत फिरायला जातं तर कोणी मित्रांसमवेत क्वालिटी टाईम स्पेंड करायला निघतात. विकेंड खऱ्या अर्थाने नोकरदार वर्गांसाठी आनंदाचे क्षण घेऊन येत असतो.
दरम्यान जर तुम्ही ही येत्या वीकेंडला कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण पुण्याजवळील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर पुणे जिल्ह्यावर निसर्ग मेहरबान आहे. जिल्ह्यात अशी काही ठिकाणे आहेत जी खरोखरच एक्सप्लोर करण्यासारखी आहेत.
जिल्ह्यातील अशा अनेक पर्यटन स्थळांवर नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. जर तुम्ही ही पुण्याजवळील एखाद्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देण्याचा प्रयत्न करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. कारण की, आज आपण पुण्याजवळील काही प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कामशेत : पुण्याजवळ असलेले हे टुरिस्ट स्पॉट पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. तुमचाही कुठे फिरण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही या टुरिस्ट स्पॉटला नक्कीच भेट दिली पाहिजे. हे टुरिस्ट स्पॉट पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण निसर्गरम्य आहे. यामुळे येथे दररोजच पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
मात्र येथे विकेंडला सर्वाधिक गर्दी असते. जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करण्याचा छंद असेल तर तुम्ही या ठिकाणाला आवर्जून भेट दिली पाहिजे. कारण की याला महाराष्ट्रातील पॅराग्लायडिंग हब म्हणून ओळखले जाते. विशेष बाब म्हणजे पुण्यापासून हे ठिकाण फक्त 48 किलोमीटर अंतरावर आहे.
यामुळे जर तुम्ही पुण्यातील रहिवासी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण लोणावळ्यापासून जवळच आहे. यामुळे लोणावळा आणि कामशेत हे दोन्ही ठिकाण एकाच दिवसात एक्सप्लोर करता येणे शक्य होणार आहे.
वाई : हे देखील महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून मात्र 85 किलोमीटर अंतरावर वसलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. येथे दररोज पर्यटकांची गर्दी असते मात्र वीकेंडला गर्दी थोडी वाढते. जर तुम्ही ही वीकेंडला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी निश्चितच फायदेशीर राहणार असून यामुळे तुम्हाला कॉलिटी टाइम स्पेंड करता येणार आहे.
या ठिकाणी तुम्हाला चहूबाजूला हिरवळ पाहायला मिळेल. जर तुम्हाला शहराच्या झगमगाटापासून शांतता हवी असेल तर हे ठिकाण निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे पुणे ते वायू असा प्रवास केला तर तुम्हाला रोड ट्रिपचा देखील आनंद घेता येणार आहे. कारण की या ठिकाणाला जाताना तुम्हाला घाटातून प्रवास करावा लागतो.
खंडाळा : हे असे ठिकाण आहे जे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दोन्ही ऋतूंमध्ये फिरण्यासारखे आहे. हे पर्यटन स्थळ पुण्यापासून जवळच आहे. यामुळे येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळते. पुण्यापासून मात्र 70 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे. येथे हिवाळ्यात धुक्याची दाट चादर पाहायला मिळते. यामुळे येथे गेलात तर तुम्हाला निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.
लोणावळा : हे महाराष्ट्रातील असं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे मुंबई आणि पुण्यापासून जवळ पडते. यामुळे वीकेंडला मुंबई आणि पुण्यातील हजारो नागरिक या ठिकाणाला भेट देतात. राज्यातील इतरही भागांमधून हजारो पर्यटक येथे येतात. येथे टायगर पॉईंट आणि लॉयन पॉईंट पाहण्यासारखे आहेत. मात्र जर तुम्ही येथे जात असाल तर आधी हॉटेलची बुकिंग तुम्हाला करावी लागणार आहे. कारण की नव वर्ष साजरा करण्यासाठी दरवर्षी येथे देशभरातील पर्यटक हजेरी लावत असतात. त्यामुळे येथे नववर्ष सुरू होण्यापूर्वी हॉटेलची बुकिंग फुल होत असते.