Famous Picnic Spot In Maharashtra : भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 बाबत आत्ताच एक मोठी गुड न्यूज दिली आहे. ती म्हणजे यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मान्सूनचे आगमन दोन दिवस आधी होऊ शकते. नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मान्सून यंदा अंदमानात 19 मे ला दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
दरवर्षी मान्सूनचे अंदमानत 21 मे च्या सुमारास आगमन होत असते यंदा मात्र दोन दिवस आधीच मानसून अंदमानात पोहोचणार आहे. यानंतर केरळ आणि मग आपल्या महाराष्ट्राच्या तळ कोकणात मान्सूनचे आगमन होईल आणि तदनंतर संपूर्ण महाराष्ट्र मान्सून काबीज करणार आहे. खरेतर मान्सून सुरू झाला की पर्यटकांचे पाय आपोआप पर्यटन स्थळांकडे वळत असतात.
पावसाळ्यात पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. याही वर्षी पर्यटकांची पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात कुठे ट्रिप काढण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील टॉप 3 ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत.
कोलाड : पावसाळा सुरू झाला की राजधानीजवळ असणाऱ्या या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. यंदा देखील येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार अशी शक्यता आहे. कोलाड हे पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय ठिकाण असून राजधानी मुंबईजवळ वसलेले आहे. खरेतर येथे बारा महिने पर्यटक येतात मात्र पावसाळ्यात येथे पर्यटनाला जाण्याची मजाच काही होत आहे.
यामुळे पावसाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच वाढते. येथे तुम्हाला अनेक पिकनिक स्पॉटला भेटी देता येणार आहेत. ताम्हिणी घाट धबधबा, भिरा धरण, घोसाळा किल्ला, सुतारवाडी तलाव, प्लस व्हॅली, तळाचा किल्ला, कुडा मांदाड लेणी, गायमुख, देवकुंड धबधबा हे या ठिकाणचे प्रमुख आकर्षण केंद्र आहेत.
कर्नाळा : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजेच कर्नाळा. कोकणाची शान म्हणून या पर्यटन स्थळाला ओळखले जाते. कोकणात कधी पिकनिक साठी विशेषता जर पावसाळ्यात कोकण फिरायला गेला तर कर्नाळ्याला भेट देणे विसरू नका. रायगड जिल्ह्यात वसलेले कर्नाळा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात भेट दिली तर पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळणार आहे. येथे पावसाळी काळात दरवर्षी असंख्य पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. 2024 च्या पावसाळ्यात देखील येथे मोठ्या प्रमाणात पब्लिक पिकनिक साठी येणार आहे. पावसाळ्यात भेट देण्याचे कारण म्हणजे या ठिकाणाचे खरे सौंदर्य हे पावसाळ्यातच समजते.
येथील सुंदरता ही मनाला मंत्रमुग्ध करणारे आहे. नेत्रदीपक अशी नैसर्गिक सौंदर्यता जर तुम्हाला अनुभवायची असेल तर एकदा रायगड जिल्ह्यात वसलेल्या या छोट्याशा पिकनिक स्पॉटला आवर्जून भेट द्या. पावसाळ्यात हा प्रदेश हिरवाईने नटलेला असतो आणि येथे तुम्हाला पावसाळ्यात वेगवेगळ्या वनस्पती पाहायला मिळतील तसेच छोटे मोठे वन्यजीव देखील तुम्हाला येथे पाहायला मिळतील.
विशेष म्हणजे या ठिकाणी ट्रेकिंग देखील करता येते. अनेकजण ट्रेकिंगसाठी या ठिकाणी येतात. या ठिकाणी गेलात तर जशन फार्म, कर्नाळा पक्षी अभयारण्य, कर्नाळा फोर्ट, शिवमंदिर आणि भवानी मंदिर या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका.
महाबळेश्वर : मुंबई आणि पुण्याजवळचं सर्वात सुंदर पिकनिक स्पॉट म्हणजेच महाबळेश्वर. राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुण्याजवळ वसलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. पावसाळ्यात येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात कुठे बाहेर पर्यटनासाठी जाण्याच्या तयारीत असाल तर महाबळेश्वरला नक्कीच विजिट करा. येथे गेल्यानंतर तुम्ही वेण्णा लेक, विल्सन पॉईंट, प्रतापगड किल्ला, महाबळेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन, टाउन बाजार, लिंगमला फॉल्स हे ठिकाण नक्कीच एक्सप्लोर केले पाहिजे.