Famous Paragliding Places in India : आजच्या तरुणांना अशा प्रवासाला जायचे आहे, जिथे केवळ दृश्यच आकर्षक नाही, तर थरारही अनुभवता येईल. लोकांना रोमांचक प्रवासासाठी अनेक ठिकाणी जायला आवडते. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही ट्रेकिंगपासून पॅराग्लायडिंग आणि बंजी जंपिंगपर्यंत वॉटर अॅडव्हेंचरचा आनंद घेऊ शकता.
जर तुम्हाला Adventure करायचे असेल तर तुम्ही पॅराग्लायडिंग करू शकता. पॅराग्लायडिंग हा एक मनोरंजक आणि साहसी खेळ आहे. ज्यामध्ये आपण आकाशात उडण्याचा आनंद घेऊ धकाते. तुम्हालाही पॅराग्लायडिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही भारतातील या पाच ठिकाणांना भेट देऊ शकता, जी पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहेत.
हिमाचल प्रदेशचे बीर बिलिंग
हिमाचल प्रदेशात अनेक हिल स्टेशन आणि पर्यटन स्थळे आहेत पण जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायचे असेल तर हिमाचलमधील बीर बिलिंगला जा. पॅराग्लायडिंगसाठी हे ठिकाण सर्वात योग्य मानले जाते. तुम्ही येथे लहान, मध्यम आणि लांब उड्डाण सत्रांचा आनंद घेऊ शकता. पॅराग्लायडिंगसाठी बीर हे टेक ऑफ पॉइंट आहे आणि बिलिंग हे लँडिंगचे ठिकाण आहे. दोघांमधील अंतर सुमारे 14 किलोमीटर आहे. ऑक्टोबर ते जून हा पॅराग्लायडिंगसाठी उत्तम काळ आहे. पॅराग्लायडिंग फी सुमारे 3500-5500 रुपये असू शकते
उत्तराखंडमधील नैनिताल
नैनिताल, उत्तराखंड येथेही तुम्ही पॅराग्लायडिंगचा अनुभव घेऊ शकता. पॅराग्लायडिंग करताना तुम्ही आकाशातून सुंदर शहर पाहू शकता. पॅराग्लायडिंगसाठी तुम्ही पावसाळ्याशिवाय कधीही नैनितालला जाऊ शकता. नैनिताल रेंजमध्ये पॅराग्लायडिंग फी सुमारे 1500-5000 रुपये आहे.
महाराष्ट्राची पाचगणी
पॅराग्लायडिंगसाठी पाचगणी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील दऱ्या, हिरवळ आणि सुंदर टेकड्या आकाशातून पाहून तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल. पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंगसाठी सर्वोत्तम महिने नोव्हेंबर ते फेब्रुवारी आहेत. पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंगसाठी अनेक टेक ऑफ पॉइंट्स आहेत, जसे की खिंगर, भिलार आणि तापोळा. येथे तुम्हाला सोलो जंपचे प्रशिक्षणही दिले जाते. जर तुम्ही पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करण्याचा विचार करत असाल तर इथली फी 1500 रुपये असू शकते.
मेघालयातील शिलाँग
शिलाँग हे भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. शिलाँगचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पॅराग्लायडिंग हा एक मजेदार उपक्रम असेल. येथे तुम्ही 700 मीटर उंचीपर्यंत पॅराग्लायडिंग करू शकता. शिलाँगमध्ये पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी उन्हाळी हंगाम हा सर्वोत्तम काळ आहे. येथे पॅराग्लायडिंग फी सुमारे 2000 रुपये आहे.
सिक्कीमचे गंगटोक
सिक्कीममधील गंगटोक शहर हे भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथील दृश्य पाहण्यासारखे आहे. जर तुम्ही पॅराग्लायडिंगला जात असाल तर तुम्ही गंगटोकला जाऊ शकता. गंगटोकमध्ये पॅराग्लायडिंग फी 1800 रुपये आहे. उन्हाळ्यात गंगटोक पॅराग्लायडिंगसाठी जाणे चांगले.