Famous Historical Place In Maharashtra : सातारा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. या शहराला सातारा हे नाव पडण्यामागे एक रंजक कारण देखील आहे. चला तर जाणून घेऊया या शहराच्या नावामागचे रहस्य आणि या सुंदर शहरात भेट देण्यासारखे कोणते-कोणते ठिकाण आहेत याबद्दल जाणून घेऊया.
सातारा हे सात डोंगरांनी वेढलेले सर्वात सुंदर शहर आहे, म्हणून या ठिकाणाला सातारा हे नाव पडले. अजिंक्यतारा, सजंगगड, यवतेश्वर, जरंडेश्वर, नकदीचा डोंगर, किटलीचा डोंगार, पेढ्याचा भैरोबा. अशी या डोंगरांची नावे आहेत. या सात टेकड्यांशिवाय, सातारा पूर्वेला सोलापूर, पश्चिमेला रत्नागिरी, उत्तरेला पुणे, दक्षिणेला सांगली यांनी शहरांनी वेढलेले आहे. या शहराला ऐतिहासिक महत्त्वही आहे.
स्वातंत्र्य चळवळीतही सातारा शहराची भूमिका महत्त्वाची होती. येथे अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जी पाहिल्यानंतर तुम्हाला या शहराची खासियत कळेल. प्रथम, साताऱ्यावर राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते आणि 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी यांचे राज्य होते.
साताऱ्यात पाहण्यासारखी अनेक मंदिरे आणि किल्ले आहेत. येथील अजिंक्यतारा किल्ला हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तो राजा भोजने बांधला होता. हा किल्ला 3000 फूट उंचीवर बांधला आहे. या किल्ल्याच्या आत मनाला प्रसन्न करणारे मंगलाई देवीचे मंदिर देखील आहे. या गडाच्या माथ्यावरून संपूर्ण सातारा शहराचे दर्शन घडते.
भारताचा समृद्ध वारसा सांगणारे असे अनेक प्राचीन किल्ले आणि मंदिरे साताऱ्यात पाहायला मिळतात. यापैकी अजिंक्यतारा किल्ला, नटराज मंदिर, सज्जनगड किल्ला आणि जल मंदिर प्रसिद्ध आहेत.
याशिवाय तुम्ही सातारा जिल्ह्यातील सुंदर हिल स्टेशन महाबळेश्वरला देखील भेट देऊ शकता. येथे तुम्हाला सुंदर मैदाने, दूरवर पसरलेले पर्वत, नद्या, धबधबे आणि अनेक किल्ले पाहायला मिळतात. पावसाळा आणि उन्हाळ्यात महाबळेश्वरच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जातात. येथे सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे आणि शांत वातावरण पर्यटकांना खूप आकर्षित करते. तुम्ही देखील या शरहार भेट देण्याचा विचार करत असाल तर महाबळेश्वरला भेट द्यायला विसरू नका.