World Most Expensive Tree : आपण आपल्या घरी जे रोप लावतो त्याची किंमत खूपच कमी असते. आपण जास्तीत जास्त 20-25 रुपयांची रोप आपल्या घरात किंवा दारात लावतो. पण तुम्हाला माहित आहे का की, असे एक रोप आहे ज्याची किंमत इतकी जास्त आहे की आपण त्या पैशात एक शानदार चारचाकी गाडी घेऊ शकतो. खरं सांगायचं झालं तर हे रोप जगातील सर्वात महाग रोपांमध्ये येत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रोपाबद्दल सांगणार आहोत जे जगात महागड्या रोपांमध्ये येते.
आम्ही ज्या रोपाबद्दल त्याचे नाव पाईन बोन्साय ट्री असे आहे. हे रोप मुख्यतः जपानमध्ये आढळते. 2011 मध्ये हे जपानी झाड $1.3 दशलक्षमध्ये विकले गेले होते. भारतीय रुपयात मोजले तर ते 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे झाड जगातील सर्वात महागडे झाड मानले जाते.
प्रसिद्ध बोन्साय ट्री आर्टिस्ट सेजी मोरिमे यांनी हे झाड एका जपानी खाजगी कलेक्टरला विकले. हे झाड ‘मियाजिमा’ बटू पाईन वृक्षाचे एक प्रकार आहे, जे उंच पाने, मजबूत, वक्र खोड असलेले झाड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोन्साय झाडाचे वय 800 वर्षांपर्यंत आहे.
बोन्सायच्या झाडाला जास्त काळ जिवंत ठेवणे फार कठीण आहे, म्हणून झाड जितके जुने तितके त्याचे मूल्य जास्त. लोक अनेक दशकांपासून त्यांची काळजी घेतात तेव्हा ही झाडे सर्वात महाग विकली जातात. बोन्साय झाडाची काळजी घेण्यामध्ये वारंवार साफसफाई करणे, खोडांची छाटणी करणे यांचा समावेश आहे.
जपानमधील हिरोशिमा येथे 400 वर्षे जुने बोन्सायचे झाड देखील आहे, ज्याला यामाकी पाईन या नावाने ओळखले जाते. हे प्रत्यक्षात यामाकी कुटुंबाच्या 6 पिढ्यांनी ठेवले होते, जे नंतर वॉशिंग्टनमधील राष्ट्रीय बोन्साय आणि पेंजिंग संग्रहालयाला दान केले गेले. या झाडाची खास गोष्ट म्हणजे 1945 मध्ये हिरोशिमा बॉम्बस्फोटातून ते वाचले होते.
खरे तर फक्त बोन्सायची झाडे एवढी महागडी विकली जात नसून, काही लाकूडही लाखो रुपये किलोने विकली जातात. यात आफ्रिकन ब्लॅकवुड लाकडाचाही समावेश होतो त्याच्या किलोची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 7 ते 8 लाख रुपये आहे.