Maharashtra Lonar Lake : भारतात अशी काही ठिकाणे आहेत जी अतिशय रहस्यमय आहेत. विशेषत: विविध राज्यांतील नद्या आणि तलावांशी संबंधित अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. अशातच महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे देखील एक रहस्यमय सरोवर आहे. ज्याचे रहस्य अजूनही कोणासमोर आलेले नाही. या सरोवराविषयी अशी कथा आहे की त्याचा रंग रहस्यमयपणे रातोरात बदलला आणि गुलाबी झाला. चला जाणून घेऊया या तलावाविषयीच्या 5 रहस्यमय गोष्टी.

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. लोणार सरोवराला लोणार विवर असेही म्हणतात. या तलावाच्या निर्मितीमागे अनेक रहस्ये आहेत. 35,000 ते 50,000 वर्षांपूर्वी हे सरोवर एका प्रचंड उल्का पडल्याने तयार झाले होते, असेही सांगितले जाते. या तलावाचा उल्लेख स्कंद पुराण आणि पद्म पुराण यांसारख्या पुराणिक ग्रंथांमध्येही करण्यात आला आहे.

या तलावाबाबत अनेक दंतकथा प्रचलित असल्याचेही सांगितले जाते. लोणासुर नावाचा एक राक्षस होता ज्याचा भगवान विष्णूने वध केला होता. त्याचे रक्त परमेश्वराच्या पायाच्या बोटाला लागले होते, ते काढण्यासाठी परमेश्वराने आपला अंगठा मातीत टाकला तेव्हा तेथे खोल खड्डा तयार झाला. असेही म्हंटले जाते.

Maharashtra Lonar Lake
Maharashtra Lonar Lake

या तलावाचे रहस्य ऐकून बरेच लोक ते पाहण्यासाठी पोहोचतात, परंतु कोणीही तलावाच्या आत जात नाही. वेळोवेळी सरोवरासंबंधीचे गूढ उकलण्याचे प्रयत्नही झाले आहेत, ज्याचे उत्तर आजतागायत समोर आलेले नाही. या तलावाचे रहस्य ऐकून बरेच लोक ते पाहण्यासाठी तेथे पोहचतात, आणि येथील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

सरोवराचा रंग गुलाबी का?

लोणार सरोवराचे पाणी गुलाबी का यावर पुणेस्थित आगरकर संशोधन संस्थेचे संचालक प्रशांत ढाकेफळकर म्हणतात, “आधीपासूनच खाऱ्या झालेल्या तलावातील क्षारता वाढली तर पाणवठे रंग बदलू लागतात.” या तलावाभोवती पर्वत आणि मंदिरे बांधलेली आहेत. या मंदिरांच्या यादीत एक शिवमंदिरही आहे जे खूप प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *