Data Entry Operator Bharti 2023 : महानगरपालिके अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मावण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 24 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करू शकतो. चला या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव आणि पदसंख्या

या भरती मोहिमेअंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या 01 जागेवर भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून आर मागवले जात आहेत.

शैक्षणिक पात्रता

शिकाऊ उमेदवार हा पदवीची अंतीम परिक्षा उत्तीर्ण असावा तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकास त्याची पदवी परिक्षा उत्तीर्ण झालेपासूनचा कालावधी हा १८ महिनेपेक्षा कमी कालावधी झालेला असावा. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

वेतन

याअंतर्गत शिकाऊ उमेदवार यांना मानधन रक्कम रुपये 10,000/- मात्र इतके असेल.

अर्ज पद्धती

यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

नोकरी ठिकाण

ही भरती सांगली मिरज कुपवाड शहर येथे होत आहे.

असा करा अर्ज

-शिकाऊ उमेदवारांचे अर्ज फक्त वर नमूद Internship.aicte-india.org या पोर्टलव्दारेच स्विकारले जातील
-दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
-अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील गरजेचे आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

भरती जाहिरात-

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *