Credit Score Tips : आजकाल तुम्ही जर कोणत्याही बँकेत कर्ज घेण्यासाठी गेला तर सर्वात प्रथम तुम्हाला क्रेडिट स्कोर विचारला जातो. मात्र अनेकांना क्रेडिट स्कोर बद्दल माहिती नसते. मात्र तुमच्या कर्जासाठी क्रेडिट स्कोर सर्वात महत्वाचा मानला जातो.
तुमचा क्रेडिट स्कोर जितका चांगला म्हणजेच मजबूत असेल तितके जास्तीत जास्त कर्ज तुम्हाला दिले जाते. तसेच कोणतीही वित्तीय संस्था तुम्हाला झटपट कर्ज मंजूर करते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.
क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?
क्रेडिट स्कोर हा तुमच्या बँकेतील आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रकार आहे. क्रेडिट स्कोर तुमची बँकेतील आर्थिक देवाणघेवाण दर्शवत असते. तुम्ही घेतलेले कर्ज वेळेमध्ये किंवा किती व्यवस्थित परतफेड करता यावर अवलंबून असतो. क्रेडिट स्कोर नेहमी 300 आणि 900 या क्रमांकामध्ये दर्शवला जातो.
तुमचा क्रेडिट स्कोर हा तुम्ही घेतलेले कर्ज कशाप्रकारे फेडता यावर अवलंबून असतो. जर तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर फेडले तर तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होत जातो. मात्र जर तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर फेडले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होतो आणि तुम्हाला कोणतीही वित्तीय संस्था सहजासहजी कर्ज देत नाहीत.
तुमचा क्रेडिट स्कोर तुम्ही रातोरात वाढवू शकत नाही. तर यासाठी तुम्हाला बँकेशी आर्थिक व्यवहार करावे लागतील. मात्र हे आर्थिक व्यवहार करत असताना तुम्हाला घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करावी लागेल.
चला तर जाणून घेऊया तुम्ही खरेदी स्कोर कसा वाढवू शकता.
वेळेवर थकबाकी भरा
जर तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज स्वरूपात काही रक्कम घेतली असेल तर त्याचे पैसे भरण्यासाठी तुम्हाला दरमहा हफ्ता भरावा लागतो. यासाठी तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला एक तारीख ठरवून दिली जाते.
या तारखेला तुम्हाला ठरवून देण्यात आलेला EMI भरावा लागतो. जर तुम्ही या तारखेला EMI भरला नाही तर तुमच्याकडुन दंड आकारला जातो आणि तुमचा क्रेडिट स्कोर देखील खराब होतो.
तुम्हीही क्रेडिट स्कोर वापरत असाल तर त्यावर तुम्ही किती रक्कम शिल्लक ठेवताय आणि घेतलेल्या रकमेची वेळेआधी किती परतफेड करताय यावर तुमचा क्रेडिट स्कोर अवलंबून असतो.
क्रेडिट युटिलायझेशन कमी ठेवा
जर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर चांगला ठेवायचा असेल तर तुमचे क्रेडिट वापर जास्त असेल तर ते मर्यादित ठेवा किंवा कमी वापर करा. नवीन क्रेडिट कार्ड मिळवून किंवा तुमच्या विद्यमान कार्डावरील मर्यादा वाढवून तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवला जाऊ शकतो.
क्रेडिट अहवाल तपासणी
तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर वाढवायचा असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर चेक करा. तसेच जर तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काह चुका असतील तर त्या दुरुस्त करा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर नक्की वाढू शकतो.
तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसणाऱ्या काही त्रुटी तुम्ही दुरुस्त केल्याने तुमचा क्रेडिट स्कोर वाढण्यास मदत होईल. तसेच तुमचा क्रेडिट स्कोर जर मजबूत असेल तर तुम्हाला कोणतीही वित्तीय शाखा झटपट कर्ज देईल.