Coconut Water Benefits : उन्हाळ्यात थंडपणा आणि ताजेपणासाठी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे एक नैसर्गिक फळ आहे. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स आढळतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचेच्या पेशींना हायड्रेशन मिळते. त्वचेशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी नारळाच्या पाण्याचे सेवन फायदेशीर मानले जाते.

नारळात पाण्यात सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, अमिनो अॅसिड, ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स यांसारखे पोषक घटक आढळतात. व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी 2, व्हिटॅमिन बी-3 सारखे पोषक घटकही नारळाच्या पाण्यात आढळतात. नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीराचे पीएच संतुलित राहते. पीएच पातळी संतुलित राहिल्याने त्वचाही निरोगी राहते. चला तर मग आज जाणून घेऊया नारळ पाणी पिण्याचे सौंदर्य फायदे-

नारळ पाणी पिण्याचे सौंदर्य फायदे

-कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता.

-नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने त्वचेला पुरेसा ओलावा मिळतो. ओलावा मिळाल्याने त्वचा चमकते.

-ओमेगा 3 फॅटी ऍसिड नारळाच्या पाण्यात आढळते. या गुणामुळे त्वचेवरील सूज, लाल ठिपके, खाज येणे इत्यादी समस्या दूर होतात.

-नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी त्याचे सेवन फायदेशीर ठरते.

-नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन-सी असते. कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी ते फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने त्वचेची लवचिकता वाढते.

-नारळ पाण्याचे सेवन केल्याने त्वचा स्वच्छ होते. डागांची समस्या दूर होते.

-नारळ पाण्याचे सेवन त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर आहे. टक्कल पडण्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी नारळ पाण्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. यातील पोषक घटक केसांच्या वाढीस मदत करतात. नारळाच्या पाण्यात प्रथिने आणि झिंकसारखे पोषक घटक आढळतात. हे पोषक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.

टीप : सकाळी नारळ पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. नारळाचे पाणी फ्रीजमध्ये ठेवून त्याची शेल्फ लाइफ वाढवता येते.पण नारळाचे पाणी ताजे प्यावे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *