Cibil Score : जर तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेत गेलात, मग ते कर्ज कोणतेही असो म्हणजेच होम लोन असो, पर्सनल लोन असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज असो बँका सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर चेक करतात. ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकांच्या माध्यमातून सहजतेने कर्ज मंजूर केले जाते.

तसेच कर्जासाठी कमी व्याजदर आकारला जातो. मात्र ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा कमी असतो त्यांना सहजतेने कर्ज मिळत नाही. अशा प्रकरणांमध्ये तर काहीवेळा बँकांच्या माध्यमातून कर्ज नाकारले सुद्धा जाते. तसेच जर कर्ज मंजूर झाले तर अधिकचा व्याजदर लावला जातो.

यामुळे, आपला सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. हा स्कोर 750 पेक्षा अधिक असल्यास चांगले मानले जाते. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून सिबिल स्कोर एका महिन्याच्या कालावधीत सुधारला जाऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सिबिल स्कोर हा एका महिन्यात सुधारू शकत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोर सुधारण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्यात तर तुमचा सिबिल स्कोर लवकर सुधारू शकतो.

वेळेवर EMI भरा : तुम्ही कर्ज घेतलेल्या असेल तर त्याचा ईएमआय वेळेवर भरा. तुमची सर्व बिल पेमेंट वेळेवर भरत चला. क्रेडिट कार्ड बिल, कर्ज ईएमआय, युटिलिटी बिले देखील वेळेवर भरले पाहिजे. उशीरा कर्जाचा हफ्ता भरल्यास किंवा हफ्ता थकल्यास तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सातत्याने कर्जासाठी अर्ज करू नका : जर तुम्ही आधीच कर्ज घेतलेले असेल तर तुम्ही नवीन कर्जासाठी अर्ज करू नये कारण तुम्ही कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरलात तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुम्ही कर्जासाठी वारंवार अर्ज करणे टाळले पाहिजे.

क्रेडिट मर्यादेचा वापर कमी करा : तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवायचा असेल तर तुम्ही किमान क्रेडिट मर्यादा वापरणे महत्त्वाचे आहे. क्रेडिट मर्यादेच्या फक्त 30 टक्के रक्कम वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

जामीनदार होताना काळजी घ्या : या व्यतिरिक्त, तुम्ही कर्ज जामीनदार होण्यापूर्वी योग्य विचार केला पाहिजे कारण ज्या व्यक्तीसाठी तुम्ही जामीनदार झाला आहात ती कर्जाची परतफेड करत नसेल किंवा वेळेवर हप्ते भरत नसेल तर त्या व्यक्तीच्या सिबिल स्कोरवर तर परिणाम होतोच शिवाय तुमच्याही स्कोरवर परिणाम होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *