HDFC Personal Loan : एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. तसेच एचडीएफसी ही देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे.

विशेष म्हणजे एसबीआय आणि एचडीएफसी या देशातील सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत.

अर्थातच येथील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. विशेष म्हणजे आरबीआयने ही माहिती दिलेली आहे. एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना सुरू करत असते.

या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, एज्युकेशनल लोन असे विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

ही बँक वैयक्तिक कर्ज अर्थातच पर्सनल लोन देखील इतर बँकेच्या तुलनेत कमी व्याजदरात उपलब्ध करून देते.

मात्र तज्ञ लोकांनी वैयक्तिक कर्ज खूपच अडचण असली तेव्हाच घ्यावे असा सल्ला दिला आहे. कारण की पर्सनल लोनसाठी इतर कर्जाच्या तुलनेत अधिक व्याज द्यावे लागते.

हेच कारण आहे की वैयक्तिक कर्ज खूपच आवश्यकता असेल तेव्हाच घेतले पाहिजे. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेकडून पाच लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्जासाठी पगारदारांकडून 10.5 टक्के व्याज आकारत आहे.

मात्र कमाल व्याजदर हा 24 टक्क्यांपर्यंत जातो. एवढेच नाही तर या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतल्यास तुम्हाला प्रोसेसिंग शुल्क देखील द्यावी लागते.

प्रोसेसिंग फी म्हणून पर्सनल लोन साठी एचडीएफसी बँक 4999 रुपये घेते. जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून पाच लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि या कर्जाची परतफेड अवधी पाच वर्ष ठेवला तर 10.5% व्याजदराने 10 हजार 747 रुपयांचा ई एम आय भरावा लागणार आहे.

म्हणजेच दहा हजार 747 रुपयांचा हप्ता पाच वर्षांसाठी भरून तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकणार आहात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *