Bollywood Actor : शेती हा व्यवसाय काळाच्या ओघात मोठा आव्हानात्मक बनला आहे. शेतीच्या व्यवसायात आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून आता अपेक्षित अशी कमाई होत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळते.

अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नानाविध संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे कित्येकदा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला बाजारात फारसा भाव मिळत नाहीये.

साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही आणि यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी होतो. मग काय कर्जाला कंटाळून कित्येक शेतकरी फासावर लटकतात. पुरोगामी महाराष्ट्रात तर फासावर लटकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी एखाद्या कलंकपेक्षा कमी नाही. मात्र काही प्रयोगशील शेतकरी बांधव आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगातून शेती व्यवसायातून देखील चांगले उत्पन्न कमावत आहेत.

दरम्यान आज आपण बॉलीवूडमधील अशा एका प्रसिद्ध अभिनेत्याची शेतीमधील यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगातून बॉलीवूड प्रमाणेच शेतीमध्ये देखील चांगले नावलौकिक कमावले आहे. खरेतर, बॉलीवूडची चंदेरी दुनिया ही प्रत्येकालाच आकर्षित करते.

मात्र या चंदेरी दुनियात प्रत्येकालाच यशाचा झेंडा काढता येत नाही. काही लोक या चंदेरी दुनियेत अयशस्वी देखील होतात. लॉकडाउनच्या काळात तर चंदेरी दुनियेतील अनेक सिताऱ्यांना परतीचा मार्ग निवडावा लागला होता. जे चंदेरी दुनियातून म्हणजेच बॉलीवूड सृष्टीतून माघारी फिरतात त्यातील काही लोक व्यवसाय करतात तर काही लोक इतर ठिकाणी आपले कसब वापरतात.

दरम्यान हिंदी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राजेश कुमार यांनी देखील कोरोना काळापासून शेती करण्यास सुरुवात केली आहे. खरे तर त्यांचा शेतीचा हा प्रवास कोरोनापूर्वीच सुरू झालेला होता. राजेंद्रकुमार हे मूळचे बिहारचे रहिवासी आहेत.

ते सध्या पालघर मध्ये 17 एकर जमिनीवर सेंद्रिय शेती करत आहेत. वास्तविक, पालघर मध्ये 17 एकर जमीन खरेदी करून राजेंद्र कुमार शेतीकडे वळले. सुरुवातीच्या काळातच राजेंद्रकुमार यांना मोठा फटका सहन करावा लागला. त्यांनी शेतीमध्ये त्यांच्याजवळ असलेली सर्व रक्कम गुंतवली होती. या शेतीमध्ये त्यांनी काही हजार फळ झाडे लावली होती.

या फळझाडांना मात्र सुरुवातीच्या टप्प्यात पुराच्या पाण्याचा फटका बसला. दोन-तीन वर्षानंतर यातून उत्पादन मिळायला सुरुवात झाली मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले आणि ही सर्व झाडे जळून गेलीत. याचा परिणाम म्हणून राजेंद्रकुमार कर्जबाजारी झालेत.

अशातच, कोरोनाचा शिरकाव झाला आणि देशात लॉकडाऊन लागले. यादरम्यान त्यांनी हार न मानता शेजारील पाच एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली आणि आपल्या मित्रांच्या मदतीने भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने त्यांनी भाजीपाला पिकवला आणि याला चांगले मार्केटही त्यांनी गवसले. परिणामी शेतीचा व्यवसाय त्यांच्यासाठी फायदेमंद ठरला.

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी त्यांची शेती पर्यटकांसाठी खुली केली. सध्या राजेंद्रकुमार हे परिसरात एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. बॉलीवूड मधला हा कलाकार आता प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे.

1999 मध्ये राजेंद्रकुमार यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतील त्याची भूमिका खूपच गाजली होती. मात्र काही काळानंतर बॉलीवूडमध्ये त्याला काम मिळेनासे झाले.

२०१७ नंतर जसजसे या इंडस्ट्रीत काम कमी झाले तसतसे राजेशने शेतीकडे आपली पाऊलं वळवली. मात्र त्याने अजून अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडलेले नाहीये. तो आजही छोट्या मोठ्या भूमिकेतुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आज त्याची खरी ओळख ही एक शेतकरी म्हणून आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *