Best Tourist Destinations In Maharashtra : सध्या देशात सर्वत्र मान्सूनचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेकजण या पावसामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र त्यांना पावसाळ्यातील सहलीसाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळे माहिती नसतात.

महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना पावसाळ्यात फिरण्यासाठी त्यांच्याच राज्यातील पर्यटन स्थळांविषयी माहिती नसते. त्यामुळे अनेकजण महाराष्ट्राबाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र त्यांना महाराष्ट्राबाहेर फिरायला जाणायची गरज नाही.

तुम्हालाही या पावसाळ्यात फिरायला जायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्रातीलच सुंदर आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांना भेट देऊन तुमच्या सहलीचा आनंद वाढवू शकता. तसेच महाराष्ट्रात फिरण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च देखील येणार नाही. तुम्ही कमी बजेटमध्ये महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.

महाराष्ट्रात पावसाळ्यात भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत

१) माळशेज घाट

तुम्हाला नैसर्गिक सुंदरतेने नटलेला घाट पाहायचा असेल तर तुम्ही एकदा नक्कीच माळशेज घाट या ठिकाणी फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करा. माळशेज घाट या ठिकाणी अनेकजण दरवर्षी येथी धबधबे, हिरव्यागार दऱ्या आणि धुक्याने झाकलेले डोंगर पाहण्यासाठी येत असतात.

माळशेज घाट या सुंदर पर्यटन ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. तसेच तुम्ही देखील या ठिकाणाला भेट देऊन एक अविस्मरणीय क्षण डोळ्यांमध्ये साठवून ठेऊ शकता.

२) तापोळा, महाबळेश्वर

महाबळेश्वर या थंड हवेच्या पर्यटन स्थळाला देखील दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. तसेच पावसाळ्यामध्ये तुम्हाला फिरायला जाण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. पुण्यापासून काही अंतरावर असलेले हे पर्यटन स्थळ देशामध्ये थंड हवेसाठी खूप प्रसिद्ध आहे. निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य उत्तम प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या हिल स्टेशनला भेट देऊन तुम्ही सुंदर धबधब्यांचे एक मनमोहक दृश्य पाहू शकता.

3) आंबोली

आंबोली घाटात देखील तुम्ही सुंदर नैसर्गिक दृश्य पाहण्यासाठी सहलीचे नियोजन करू शकता. या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगावरून पडणारे सुंदर धबधबे तुम्ही पाहू शकता. समृद्ध जैवविविधतेने नटलेले हे सुंदर ठिकाण तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे.

4) पाचगणी

सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक प्रमुख आकर्षण म्हणून पाचगणीला ओळखले जाते. या ठिकाणी तुम्ही मनोहारी दृश्ये, मंदिरे, तलाव आणि भव्य पाणवठे पाहू शकता. पाचगणीला जाताना तुम्ही माउंट माल्कम, सिडनी पॉइंट, टेबल लँड, वेन्ना लेक आणि बॉम्बे पॉइंट या ठिकाणांना देखील भेट देऊ शकता.

5) लवासा

महाराष्ट्रातील लवासा या शहराला इटालियन शहर म्हणून देखील ओळखले जाते. लवासा हे सुंदर ठिकाण टेकडीवर वसलेले आहे. पावसाळ्यात तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत या ठिकाणी भेट देऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे नयनरम्य दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *