Best Places to Visit in Pune : पुणे हे शहर शिक्षण तसेच खाद्यपदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. शुद्ध मराठी बोलण्यापासून ते महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्यापर्यंत येथे सर्वच गोष्टी प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त या शहरात तुम्हला कडक शिस्त देखील पाहायला मिळेल. अशा या उत्साही शहराच्या आजूबाजूच्या ठिकाणांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या विकेंडचा प्लॅन बनवू शकता. चला तर मग थोडाही उशीर न करता जाणून घेऊया या खास ठिकाणांबद्दल.
कामशेत आणि पवना तलाव
तलाव किंवा पाणवठे आणि उंच पर्वतांची हिरवाई कोणाला आवडत नाही. यासोबतच जर तुम्हाला काही साहसी गोष्टीही करायच्या असतील तर तुमच्यासाठी येथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यापासून पवना तलाव 50-60 किमी आणि कामशेत 48-50 किमी अंतरावर आहे. पवना तलावावर कॅम्पिंगची सुविधाही उपलब्ध आहे आणि कामशेत येथे पॅराग्लायडिंग करता येते. पवना तलावाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते एप्रिल हा सर्वोत्तम काळ आहे आणि कामशेतला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मे हा सर्वोत्तम काळ आहे.
लोणावळा आणि खंडाळा
ही नावे तुम्ही बहुतेक चित्रपटांमध्ये ऐकली असतील. काही बॉलीवूड दिग्गज अभिनेत्यांची फार्महाऊस देखील येथे सापडतील. दोन्ही ठिकाणे हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेली आहेत. खंडाळा (65-70 किमी) आणि लोणावळा (60-65 किमी) आहे. येथे तुम्हाला नैसर्गिक धबधबे पाहायला मिळतील तसेच येथील खास पदार्थांची चव देखील चाखायला मिळेल. ही दोन्ही ठिकाणे एकमेकांपासून फक्त 3 तासांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे तुम्ही एकाच दिवसात दोन्ही ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन करू शकता.
लवासा आणि इमॅजिका
तंत्रज्ञान आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच मानवनिर्मित मनोरंजन आणि पर्यटनाची ठिकाणे शहरांमध्ये दाखल झाली आहेत. जर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा याशिवाय एखाद्या ठिकाणी भेट द्यायची असेल, तर हायटेक आणि मौजमजेने भरलेली ही दोन ठिकाणे तुमच्यासाठी टम्म असतील. ही दोन्ही ठिकाणे स्वतःमधेच खूप खास आहेत. लवासा पुण्यापासून 55-60 किमी अंतरावर आहे आणि इमॅजिका सुमारे 100 किमी अंतरावर आहे.