Best Picnic Spot In Maharashtra : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे आता अनेकांनी आपल्या परिवारासमवेत पिकनिकचा प्लॅन आखला आहे. जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल आणि तुम्ही तुमच्या परिवारासमवेत कुठे फिरायला निघणार असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.
खरेतर जेव्हाही पिकनिकचा विषय निघतो तेव्हा साऱ्यांच्या नजरा आपल्या शेजारील राज्याकडे अर्थातच गोव्याकडे जातात. पर्यटनासाठी गोवा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे. गोव्याला दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक भेटी देत असतात.
मात्र आज आपण महाराष्ट्रातील गोव्याबाबत जाणून घेणार आहोत. आज आपण राज्यातील अशा एका पर्यटन स्थळाची माहिती पाहणार आहोत ज्याला महाराष्ट्राचे गोवा म्हणून ओळखले जाते. हो बरोबर विचार करताय तुम्ही आम्ही बोलत आहोत अलिबाग विषयी.
अलिबागला महाराष्ट्राचे गोवा म्हणून ओळखले जाते. जर तुमचाही यंदाच्या उन्हाळ्यात कुठे बाहेर पिकनिकसाठी जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही अलिबागला तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच ऍड केले पाहिजे.
तुम्ही तुमच्या परिवारासमवेत अथवा मित्रांसमवेत किंवा मग तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत अलिबागला भेट देऊ शकता. आता आपण अलिबागमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या टॉप तीन ठिकाणाची माहिती जाणून घेणार आहोत.
मुरुड जंजिरा : अलिबागला गेलात तर या किल्ल्याला आवर्जून भेट द्या. हा किल्ला अलिबाग पासून 54 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकता.
अलिबाग बिच : गोव्याला गेल्यानंतर पर्यटक तेथील समुद्रकिनाऱ्यावर क्वालिटी टाईम स्पेंड करतात. उन्हाळ्यात अशा समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची मजा काही औरच असते. मात्र जर तुमची गोव्याची ट्रिप निघत नसेल आणि तुम्ही अलिबागला पोहोचलात तर चिंता करू नका अलिबागला देखील तुम्हाला गोव्यासारखाच फिल येणार आहे. अलिबाग आपल्या समुद्रकिनाऱ्यासाठी देखील विशेष लोकप्रिय आहे.
नागाव बीच : अलिबागला गेल्यानंतर अलिबाग बीच तर नक्कीच एक्सप्लोर करा शिवाय तुम्हाला नागाव बीचला देखील जाता येणार आहे. अलिबागपासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजेच अवघ्या नऊ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर हा बीच आहे.
कुलाबा किल्ला : अलिबागला पोहोचताच तुम्ही कुलाबा किल्ल्याला गेले पाहिजे. कारण की हा किल्ला अलिबाग पासून अवघ्या एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर वसलेला आहे. यामुळे तुमची अलिबाग ट्रिप निघाली तर या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका.