Best Picnic Spot : तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करायला आवडते का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची राहणार आहे. विशेषतः ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची राहणार आहे.
ट्रेकिंगला जाणे अनेकांना आवडते. ट्रेकिंग साठी अनेकजण हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. जर तुम्हालाही या वीकेंडला ट्रेकिंगसाठी घराबाहेर निघायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी भारतातील तीन प्रसिद्ध ठिकाणांची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
या ठिकाणी ट्रेकिंगला गेल्यास तुमची ट्रिप खूपच उत्साही होणार आहे. खरेतर ट्रेकिंगमुळे शारीरिक व्यायाम होतो. निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगसाठी गेल्यास मानसिक स्वास्थ्य देखील मजबूत राहते. यामुळे अनेकजण आपल्या रुटीन लाईफ मधून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगसाठी जात असतात.
दरम्यान जर तुमचाही ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन असेल तर आज आम्ही तुम्हाला ज्या तीन ठिकाणांची माहिती सांगणार आहोत त्या ठिकाणी गेल्यास तुमची ट्रिप मनोरंजक आणि अतिशय चित्तथरारक होणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया त्या तीन ठिकाणांविषयी.
गोमुख तपोवन ट्रेक : हे ट्रेकिंग साठी एक सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात हे ठिकाण वसलेले आहे. येथे दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक ट्रेकिंगसाठी गर्दी करत असतात.
या ठिकाणी तुम्हाला शंभू महादेवांच्या भव्य शिवलिंगाचे शिखर पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला हिमालय पर्वत सर करायचा असेल अर्थात हिमालय पर्वतावर तुम्हाला ट्रेकिंग करायची असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट राहणार आहे.
सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यात जसा आनंद मिळतो तसाच आनंद या हिमालय पर्वताच्या डोंगरांवर देखील मिळतो. यामुळे जर तुम्ही ट्रेकिंगसाठी कुठे जाणार असाल तर हे ठिकाण तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच समाविष्ट करा.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रेक : हे देखील ट्रेकिंग साठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. उत्तराखंड मधील हे ठिकाण जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. हेच कारण आहे की येथे देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
विशेष म्हणजे विदेशातील पर्यटक देखील येथे पर्यटनासाठी हजेरी लावतात. जर तुम्ही ही ट्रेकिंग साठी कुठे जाणार असाल तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रॅक हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो.
व्यास कुंड ट्रेक : येथे गेल्यानंतर तुम्हाला निसर्गाचे अद्भुत सौंदर्य आपल्या नजरेत कैद करता येणार आहे. हे ठिकाण मनाली मध्ये येते. यामुळे जर तुम्ही मनाली या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देण्याच्या तयारीत असाल तर तिथे गेल्यानंतर या ट्रेकिंग पॉईंटला देखील नक्कीच भेट द्या. येथे गेल्यानंतर तुमची ट्रिप अधिकच मनोरंजक आणि चित्त थरारक होणार आहे.