7 Seater Cars In India : भारतीय बाजारपेठेत सतत नवनवीन कार्स लाँच होत असतात. परंतु काही दिवसांपासून कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना कार खरेदी साठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परंतु आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता अतिशय कमी किमतीत 7-सीटर कार खरेदी करू शकता. अत्याधुनिक फीचर्ससह या कार सुसज्ज असून तुम्ही त्या खरेदी करू शकता. ज्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत होईल. पहा त्यांची सविस्तर यादी.
रेनॉल्ट ट्रायबर
किमतीचा विचार केला तर रेनॉल्ट ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत ६.३३ लाख ते ८.९७ लाख रुपये इतकी आहे. ही देशातील अतिशय लोकप्रिय 7-सीटर MPV असून यात 1.0-लिटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 71 bhp पॉवर तसेच 96 Nm टॉर्क जनरेट करत आहे. कंपनीने यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय असून कार 7 आसनी कॉम्पॅक्ट MPV आहे. जिची लांबी 4 मीटरपेक्षा कमी असून ही कार फक्त पेट्रोल इंजिनसह बाजारात लॉन्च केले आहे. या कारच्या सीट्स खूप खास आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या गरजेनुसार काढता तसेच वाकवता येतात आणि फोल्ड करताही येतात. ही कार तुम्ही 4 प्रकार आणि 5 रंगांमध्ये खरेदी करू शकता.
मारुती सुझुकी एर्टिगा
जर किमतीचा विचार केला तर सुझुकीच्या एर्टिगा या कारची एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख ते 12.79 लाख रुपये इतकी आहे. सध्या देशात सर्वात जास्त विकली जाणारी MPV कार आहे. यात 1.5-लीटर NA पेट्रोल इंजिन मिळत असून जे 99 bhp पॉवर तसेच 136.8 Nm टॉर्क निर्माण करते. 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय सुझुकीच्या एर्टिगा कारमध्ये देण्यात आला आहे.
Kia Carens
कियाच्या या कारची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख ते 18.95 लाख रुपये इतकी आहे. जी 1.5-लीटर NA पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असून जी 113 bhp पॉवर जनरेट करते. 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला असून जे 158 bhp पॉवर निर्माण करते तसेच 1.5-लीटर डिझेल इंजिन 114 bhp पॉवर निर्माण करते.
महिंद्रा बोलेरो निओ
महिंद्राच्या या कारची एक्स-शोरूम किंमत 9.63 लाख ते 12.14 लाख रुपये असून निओला 1.5-लीटर mHawk डिझेल इंजिन देण्यात येते, जे 98 bhp पॉवर आणि 260 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे लक्षात ठेवा की ही कार फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आली आहे.
मारुती सुझुकी Eeco
मारुती सुझुकीची ही देशातील सर्वात कमी किमतीत येणारी 7-सीटर कार आहे. कंपनीने यात पेट्रोल आणि सीएनजीचा पर्याय दिला आहे. यामध्ये 1.2-लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिन पाह्यला मिळते, जे 81 Bhp पॉवर आणि 104 Nm टॉर्क निर्माण करत आहे. इतकेच नाही तर यामध्ये केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात येतो. जर किमतीचा विचार केला तर या कारची एक्स-शोरूम किंमत 5.25 लाख ते 6.51 लाख रुपये इतकी आहे. कंपनीच्या मतानुसार, ही कार पेट्रोल मोडमध्ये 20.20 किमी/से सतत मायलेज देते. तर, S-CNG प्रकारात ती 27.05 km/kg पर्यंत मायलेज देते. तर कारच्या आतील बाजूस, यात ड्रायव्हर-केंद्रित नियंत्रणे, समोरील सीट, केबिन एअर फिल्टर आणि नवीन बॅटरी-सेव्हर कॅटलॉग यांसारखी शानदार फीचर्स देण्यात आहेत.