Banking News : उद्या अर्थातच 17 एप्रिलला संपूर्ण भारतभर रामनवमीचा मोठा पर्व साजरा होणार आहे. रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे 22 जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे तब्बल 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू रामराया भव्य अशा मंदिरात विराजमान झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी ठरणार आहे.
मात्र जर तुम्ही रामनवमीला बँकेशी संबंधित काही कामे करण्याच्या तयारीत असाल आणि बँकेत जाण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे रामनवमी सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
देशभरातील काही शहरांमध्ये रामनवमी निमित्ताने खाजगी आणि सरकारी बँका बंद राहतील अशी माहिती आरबीआयने जारी केलेल्या सर्क्युलरमधून समोर आली आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांना कॅश भरणे, कॅश काढणे, बँक अकाउंट ओपन करणे तथा कर्जाचे हप्ते भरणे यांसारखे विविध कामे करताना अडचणी येणार आहेत.
तथापि, बँकेच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन सुविधा सुरू राहणार आहे. यामुळे रामनवमी निमित्ताने ज्या शहरांमधील बँका बंद असतील तेथील नागरिकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन आपली बँकिंग कामे पूर्ण करावीत असे आवाहन केले जात आहे.
खरे तरच 17 एप्रिल 2024 ला रामनवमीनिमित्ताने महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रात सुट्टी असते. यंदा देखील महाराष्ट्रात राम नवमीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोण-कोणत्या शहरात बंद राहणार बँका
देशातील काही राज्यांमध्ये राम नवमीच्या निमित्ताने सार्वजनिक आणि खाजगी बँका उद्या, 17 एप्रिल 2024 ला बंद राहणार आहेत. पण सर्वच राज्यांमध्ये बँका बंद राहणार नाही. कारण की, बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार भिन्न असतात.
जसे की, महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या सणाला सुट्टी जाहीर असते. पण, देशातील इतर राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी नसते. त्याचप्रमाणे राम नवमी अर्थातच प्रभू श्री रामजी जयंती निमित्ताने काही राज्यांमध्ये सुट्टी असते तर काही राज्यांमध्ये बँकात सुरू राहतात.
हाती आलेल्या माहितीनुसार उद्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची, शिमलाओन येथे बँका बंद राहणार आहेत.