Banking Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः जे तरुण बँकेच्या भरती परीक्षांची तयारी करत असतील अशा उमेदवारांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. कारण की देशातील एका बड्या बँकेत मेगा भरती निघाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा या बड्या बँकेत विविध रिक्त पदांसाठी नुकतीच भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदभरती अंतर्गत विविध पदांच्या रिक्त असलेल्या 250 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे यासाठीची नोटिफिकेशन अर्थातच अधिसूचना देखील बँकेच्या माध्यमातून नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे.

तसेच या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत असे आवाहन बँकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे आज आपण बँक ऑफ बडोदा मध्ये निघालेल्या या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

बँक ऑफ बडोदा ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदभरती अंतर्गत सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती

सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप या पदाच्या एकूण 250 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

1)या पदासाठी 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा आठ वर्ष अनुभव असलेला उमेदवार पात्र राहणार आहे. 

2) किंवा पदव्युत्तर पदवी /MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य पदवीधारक आणि 6 वर्षे अनुभव असलेला उमेदवार या भरतीसाठी पात्र राहणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी 18 ते 37 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहतील. तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार या ठिकाणी तीन वर्षांपासून ते पाच वर्षांपर्यंतची सूट देखील दिली जाणार आहे.

किती पगार मिळणार

या पदभरती अंतर्गत जे उमेदवार सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप या पदावर नियुक्त होतील त्यांना 63 हजार 840 ते 78 हजार 230 रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

www.bankofbaroda.co.in. या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 26 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत आणि कुठल्याही सबबीवर अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे.

जाहिरात कुठं पाहणार 

बँक ऑफ बडोदा नवीन भरती जाहिरात 2023 या लिंक वर क्लिक करून इच्छुकांना या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *