Banking Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. विशेषता जे तरुण बँकेत नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतील, तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास राहील. कारण की, देशातील एका मोठ्या सरकारी बँकेत पदभरती आयोजित करण्यात आली आहे.

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अर्थातच आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. ज्यांची आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची तयारी असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे.

या बँकेत तब्बल 500 रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. याची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

यामुळे जर तुम्हीही या भरतीसाठी पात्र असाल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज या ठिकाणी करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण आयडीबीआय बँकेत निघालेल्या या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आणि तपशीलवार पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी होणार भरती

बँकेने काढलेल्या अधिसूचनेनुसार, या पदभरतीच्या माध्यमातून जूनियर असिस्टंट मॅनेजर या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती

या भरतीच्या माध्यमातून 500 रिक्त जागा भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. जूनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र राहतील अशी माहिती अधिसूचनेतून समोर आली आहे. मात्र सदर उमेदवार आणि मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे अतिशय आवश्यक आहे. याशिवाय प्रादेशिक भाषेचे ज्ञान देखील उमेदवाराला असणे आवश्यक आहे. संगणक कौशल्य असलेल्या उमेदवारांनाच या ठिकाणी सिलेक्ट केले जाणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी 20 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. अर्थातच किमान 20 आणि कमाल 25 वर्ष वय असलेल्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे.  तथापि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. याबाबत तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन सविस्तर जाहिरात वाचा.

अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार

या भरतीसाठी 12 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

यासाठी इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. https://www.idbibank.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित मुदतीच्या आत सबमिट करायचा आहे.

जाहिरात कुठे पाहणार

https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:e8475bc3-a2c4-470a-a228-2c1570a439c6 या लिंकवर जाऊन इच्छुकांना या भरतीची जाहिरात पाहता येणे शक्य होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *