Banking Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या तरुणांना बँकेत काम करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी तर ही बातमी खूपच खास राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देशातील एका बड्या बँकेत तब्बल 484 रिक्त जागांसाठी मेगा भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे.

यामुळे जर तुम्हीही सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करू इच्छित असाल तर ही भरती तुमच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे.

दरम्यान आज आपण या भरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेन्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार बँकेत सफाई कर्मचारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. 484 रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

आवश्यक शैक्षणिक अहर्ता

सफाई कर्मचारी पदासाठी फक्त दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. परंतु अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून SSC परीक्षा पास आऊट असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी किमान 18 ते कमाल 26 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहतील. म्हणजेच उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 26 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

अर्ज कसा करावा लागणार

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. centralbankofindia.co.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना आपला अर्ज सादर करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन 9 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विहित कालावधीतच उमेदवारांना अर्ज करता येईल. कालावधी उलटल्यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *