Banking Job : तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? मग थांबा, ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. नोकरीच्या शोधात विशेषतः बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील एका बड्या पब्लिक सेक्टर बँकेत अर्थातच सार्वजनिक बँकेत मोठी भरती निघाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा या पब्लिक सेक्टर बँकेत ही भरती आयोजित करण्यात आली आहे. खरेतर देशात एकूण 12 PSB म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. यात बँक ऑफ बडोदाचा देखील समावेश होतो. या बँकेचे नेटवर्क जवळपास संपूर्ण भारतात विस्तारलेले आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत.
बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, जर तुमचे सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आली आहे. बँक ऑफ बडोदाने विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती काढली आहे.
यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या बँक ऑफ बडोदा च्या नवीन पदभरती बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती ?
अधिसूचनेतून मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडोदा मध्ये सुरक्षा अधिकारी या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे.
किती पदांसाठी होणार भरती ?
या भरतीच्या माध्यमातून 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वसामान्यांसाठी 18, ओबीसी साठी 10, ई डब्ल्यू एस साठी 3, एस सी कॅटेगिरी साठी 5 आणि एसटी कॅटेगिरी साठी तीन अशा 38 जागा राहणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
मिळालेल्या माहितीनुसार ज्या उमेदवारांकडे आर्मी/नेव्ही/एअर फोर्समधील कमिशन्ड सेवेचा किमान पाच वर्षांचा अनुभव असेल आणि जे उमेदवार पदवीधर असतील त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी किमान 25 आणि कमाल 35 वर्ष वय असलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
किती पगार मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार या भरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 49 हजार 910 ते 69 हजार 910 दरम्यान पगार दिला जाणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECT_SD2023/ या लिंक वर जाऊन इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज सादर करता येईल.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
बँक ऑफ बडोदा मध्ये निघालेल्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विहित मुदतीत अर्ज करायचा आहे मुदत उलटल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद उमेदवाराने घेणे अपेक्षित आहे.
जाहिरात कुठे पाहणार
https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:7ed1ed27-7e1a-4ad5-bad3-1803d4afcf59 या लिंकवर जाऊन या भरतीची सविस्तर माहिती पाहता येणार आहे.