Bank Of Baroda Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. विशेषतः ही बातमी पब्लिक सेक्टरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील पब्लिक सेक्टरमधील म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बड्या बँकांमध्ये समाविष्ट असलेल्या बँक ऑफ बडोदा मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे.
यासाठीची अधिसूचना देखील बँकेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे. तसेच या अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र राहणार असून उमेदवारांना मुदतीपूर्व अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील बारा पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टर बँकेत समाविष्ट असलेल्या बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी असून आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती
बँक ऑफ बडोदा ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदभरती अंतर्गत मॅनेजर अर्थातच व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती
या पदभरतीच्या माध्यमातून 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वसामान्यांसाठी 18-जागा, ओबीसी-10, अनुसूचित जाती अर्थातच एससी-5, अनुसूचित जमाती म्हणजे ST-2, EWS – 3 जागा आरक्षित राहणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी पात्र राहणार आहे. तथापि सदर पदवीधराने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक राहील.
आवश्यक वयोमर्यादा
या पदासाठी किमान 25 आणि कमाल 38 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहे. म्हणजेच 25 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त उमेदवार या पदासाठी अपात्र राहतील त्यांना अर्ज करता येणार नाही.
अर्ज कसा करावा लागणार ?
या भरतीसाठी पात्र इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 19 जानेवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून https://www.bankofbaroda.in/ या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार आहे. उमेदवारांना दिलेल्या मुदतीत अर्ज करायचा आहे. मुदत संपल्यानंतर या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायचे आहे.
जाहिरात कुठे पहा https://drive.google.com/file/d/1ZBgjAa4c9BDk2Lq2djK7AujcwLGsS5tP/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन इच्छुकांना या पदभरतीची जाहिरात पाहता येणे शक्य होणार आहे.