Bank of Baroda Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांवर भरती आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. जे उमेदवार येथे नकोरी करण्यास इच्छुक असतील त्यांनी ऑनलाईन अर्ज 17 मे 2023 पर्यंत पाठवायचा आहे. चला या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया-
पदाचे नाव आणि रिक्त जागा
रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट एनालिस्ट, क्रेडिट एनालिस्ट, फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर, फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या एकूण 157 जागांवर भरती होत आहे.
वयोमर्यादा
उमेदवार येथे 24 ते 42 वर्षापर्यंत अर्ज करण्यास पात्र आहे. (विविध पदांवर वेगवेगळी वयोमर्यादा आहे.) तर SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क
यासाठी 600/- रुपये इतके अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत. [SC/ST/PWD/महिला – 100/- रुपये]
अर्ज पद्धती
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
असा करा अर्ज
-या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/bobsomar23/ या वेबसाईट करायचा आहे.
-लक्षात घ्या वर दिलेल्या वेबसाईटद्वारेच अर्ज करायचेआहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील महत्वाचे आहे.
-ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 मे 2023 आहे.
-भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.bankofbaroda.in या वेबसाईटला भेट द्या.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.