Bank FD News : तुमचाही बँकेत एफडी करण्याचा प्लॅन आहे का मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. खरे तर अलीकडे एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अलीकडे देशातील प्रमुख बँकांनी एफडीवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एचडीएफसी या प्रायव्हेट सेक्टर मधील बँकेने एफडीच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे.
बँकेने 18 महीने कालावधीपासून ते 21 महिने कालावधीपर्यंतच्या एफडीसाठी दिल्या जाणाऱ्या व्याजदरात 0.25% एवढी वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना बँकेच्या या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.25 टक्के एवढे घसघशीत व्याज मिळणार आहे.
त्याशिवाय प्रायव्हेट सेक्टर मधील आयसीआयसीआय या बँकेने देखील एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याचा मोठा निर्णय नुकत्याच काही दिवसांपूर्वी घेतला आहे. यामुळे फेब्रुवारीचा हा महिना एफडी करणाऱ्यांसाठी निश्चितच आनंदाची पर्वनी घेऊन आला आहे, असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
विशेष बाब म्हणजे तज्ञांनी आगामी काळात देशातील प्रमुख बँका एफडीच्या व्याजदरात आणखी वाढ करणार असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान आज आपण एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस यापैकी एफडी साठी सर्वात जास्त व्याजदर कोणती बँक ऑफर करत आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
HDFC Bank : प्रायव्हेट सेक्टर मधील ही सर्वात मोठी बँक आहे. RBI ने गेल्या काही महिन्यांपूर्वी देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी प्रदर्शित केली होती. यामध्ये एचडीएफसी बँकेचा देखील समावेश होता. एचडीएफसी आपल्या ग्राहकांना एफडी करिता चांगले व्याजदर ऑफर करत आहे.
बँकेकडून सर्वसामान्य ग्राहकांना एक वर्षांच्या एफडी करता 6.60% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.10% एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे. तसेच बँकेकडून 18 महिने ते 21 महिने कालावधीच्या एफडी साठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे घसघशीत व्याज दिले जात आहे.
ICICI Bank : ही देखील देशातील एक प्रमुख बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना एक वर्षांच्या एफडी साठी 7.40% एवढे व्याज दिले जात आहे. 390 दिवसांपासून ते पंधरा महिन्याच्या एफडी साठी या बँकेकडून 7.30% एवढे व्याज ऑफर केले जात आहे. 15 महिने ते दोन वर्षे या कालावधीच्या एफडीसाठी या बँकेकडून 7.05 एवढे व्याज दिले जात असे.
स्टेट बँक ऑफ इंडिया : देशातील पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचा गौरव केला जातो. बँक आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात गृह कर्ज, सुवर्ण कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे.
शिवाय बँकेकडून एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देखील दिला जात आहे. एसबीआय बँक एक वर्षांच्या एफडी साठी 6.80 टक्के एवढे रिटर्न देत आहे. दोन ते तीन वर्षांच्या एफडी साठी बँकेकडून 7 टक्के एवढे रिटर्न दिले जात आहे.
तीन ते पाच वर्षांच्या एफडी साठी 6.75 टक्के एवढे रिटर्न मिळत आहे. जेष्ठ नागरिकांना मात्र 0.50 टक्के अधिकचे व्याजदर देण्याची बँकेची पॉलिसी आहे.
ॲक्सिस बँक : ॲक्सिस बँक ही देशातील एक प्रमुख बँक आहे. या बँकेने 5 फेब्रुवारी 2024 ला एफ डी व्याजदरात मोठा बदल केला आहे. बँकेने FD व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे. या बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एका वर्षाच्या एफडीवर 6.7 टक्के परतावा दिला जात आहे.
2 वर्षांच्या एफडीवर 7.10 टक्के एवढा परतावा दिला जात आहे. ३ वर्षांच्या एफडीवर ७.१० टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७ टक्के व्याज मिळत आहे.