Auto News : ऑटो मार्केटमध्ये Citroen कंपनी देखील एक चांगला पर्याय म्हणून उदयास येत आहे. Citroen कंपनीच्या वाहनांनाही खूप पसंती दिली जात आहे. गेल्या वर्षी, कार निर्मात्या Citroen कंपनीने आपला C3 हॅचबॅक फील आणि लाइव्ह या दोन प्रकारांमध्ये सादर केला होता. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.71 लाख ते 8.06 लाख रुपये होती. कंपनीने जानेवारी 2023 मध्ये ही किंमत वाढवली होती.
C3 हॅचबॅकच्या टॉप-ऑफ-द-लाइन शाईन ट्रिममध्ये शाईन, शाइन वाइब पॅक, शाइन ड्युअल-टोन विथ वाइब पॅक आणि शाइन ड्युअल-टोन प्रकारांचा समावेश आहे. ही ट्रिम आतापर्यंत फक्त NA पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होती. पण आता कंपनीने टर्बो पेट्रोल इंजिनसह शाइन व्हेरिएंट लॉन्च केले आहे.
Citroen C3 Turbo Feel DT व्हेरियंटची किंमत 8.28 लाख रुपये आहे, C3 Turbo Feel DT Vibe पॅकची किंमत 8.43 लाख रुपये आहे, C3 Turbo Shine DT ची किंमत 8.80 लाख रुपये आहे, C3 Turbo Shine DT Vibe पॅकची किंमत आहे 8.92 लाख रुपये. सर्व किंमती दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार आहेत.