Asia Longest Skywalk : आगामी लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चिखलदरा येथे निर्माण होत असलेल्या स्कायवॉकच्या कामाला देखील गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

खरे तर, चिखलदरा या थंड हवामानाच्या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देत असतात. हे राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे राज्यासह संपूर्ण देशभरातील आणि विदेशातील लोक पर्यटनासाठी येतात.

दरम्यान, या पर्यटनक्षेत्राचा कायाकल्प व्हावा या अनुषंगाने या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा स्कायवॉक विकसित केला जात आहे. याचे काम 2019 मध्ये सुरू झाले असून आतापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मात्र वर्षभरापूर्वी गुजरात येथील मोरबी या ठिकाणी एका पुलाचे बांधकाम पडले. यामुळे आयआयटी कानपूरच्या तज्ञांनी चिखलदरा येथील या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.

दरम्यान, त्यावेळी तज्ञांनी हा एक रोप सस्पेन्शन ब्रिज असल्याने यासाठी विंड टनेल टेस्ट करावी लागणार असा सल्ला दिला आणि या प्रकल्पाचे काम तेव्हापासून थांबवण्यात आले आहे. सध्या कानपूर व दिल्ली आयआयटीचे तज्ञ या प्रकल्पासाठी विंड टनेल टेस्ट करत आहेत.

ही टेस्ट पूर्ण झाल्यानंतर आणि टेस्ट रिपोर्ट मध्ये हा प्रकल्प सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकणार आहे. मात्र अद्याप या टेस्टचा रिपोर्ट आलेला नाही. यामुळे जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा या प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा सुरू होईल असे सांगितले जात आहे.

दरम्यान या प्रकल्पाचे काम नवीन वर्षात पुन्हा सुरू होईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड वर्षांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण होईल असा आशावाद देखील व्यक्त केला जात आहे.

कसा राहणार प्रकल्प ? 

चिखलदरा येथे तयार होत असलेला हा प्रकल्प 407 मीटर लांबीचा आहे. या Skywalk प्रकल्पात मध्यभागी 80 ते 100 मीटर अंतराचा काच बसवला जाणार आहे.

या प्रकल्पामुळे चिखलदरा येथे असणारी दरी उघड्या डोळ्याने पाहता येणार आहे. या पुलावरून पर्यटकांना 540 फूट उंचीवरून ही दरी पाहता येईल. या स्कायवॉकची रुंदी 2.35 मीटर म्हणजे 7.7 ft एवढी राहणार आहे.

या स्कायवॉकवर एकाच वेळी 500 लोकांना चालता येणार आहे. पण या पुलावर चालताना शूज किंवा चप्पल वरून विशेष सॉक्स घालावे लागणार आहेत. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *