Maharashtra Picnic Spot : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटत चालला आहे. लवकरच आता मान्सूनला सुरुवात होणार आहे. यंदा मान्सून काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटन स्थळांवर गर्दी करणार आहेत. जर तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात कुठे ट्रिप काढण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी ही तुमच्यासाठी खूपच खास करणार आहे.

खरे तर पावसाळ्यात अनेक जण महाराष्ट्र बाहेर पर्यटनासाठी जात असतात. मात्र आपल्या महाराष्ट्रातच असे काही ठिकाण आहेत जे की खूपच मनमोहक आहेत आणि या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करत असतात. राज्यात फिरण्यासाठी अनेक छोटे मोठे पिकनिक स्पॉट आहेत.

दरम्यान आज आपण अशाच एका पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत त्याला महाराष्ट्राची देवभूमी म्हणून ओळखले जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली हे गाव पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या ठिकाणी दररोज पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. दरम्यान आज आपण तारकर्ली गावात पाहण्यासारखे कोण कोणते स्पॉट आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

तारकर्ली बीच : स्वच्छ समुद्रकिनारे हे या गावाचे वैशिष्ट्य आहे. तारकर्ली बीच हे एक पाहण्यासारखे ठिकाण आहे. जिथे सामान्य दिवशी वीस फूट खोल पाणी तुम्ही आरामात पाहू शकता.

समुद्राचे इतके स्वच्छ पाणी तुम्हाला इतरत्र कुठेच पाहायला मिळणार नाही. यामुळे या ठिकाणी नेहमीच पर्यटक गर्दी करत असतात. समुद्राचे हे विहंगम दृश्य उघड्या डोळ्याने पाहण्याची मजाच काही और आहे.

आचरा बीच : तारकर्ली बीच तर पाहण्यासारखा आहेच शिवाय येथून जवळच असणारा आचरा बीच देखील पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. तारकर्ली पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर हा बीच तुम्हाला पाहायला मिळतो.

या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे येथील थंड हवामान, जे पर्यटकांना खूपच आवडते. येथे भगवान रामेश्वरांचे मंदिर देखील आहे. विशेष म्हणजे हे मंदिर जवळपास अडीच शतकांपूर्वी बांधले गेले आहे. या प्राचीन मंदिरात दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. त्यामुळे जर तुम्हीही या ठिकाणी गेलात तर या मंदिराचे दर्शन घ्यायला विसरू नका.

सिंधुदुर्ग किल्ला : या गावात सिंधुदुर्ग किल्ला देखील आहे. या किल्ल्यात तुम्हाला अनेक देवी देवतांचे मंदिरे पाहायला मिळतील. हा किल्ला खूपच ऐतिहासिक असून तारकर्ली गावात पर्यटनासाठी गेलात तर सिंधुदुर्ग किल्ल्याला नक्कीच विजिट करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *