Reliance Jio Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जात असतात.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी परवडणाऱ्या दरात रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. खरंतर जिओच्या ग्राहकांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जिओची ग्राहक संख्या करोडोंच्या घरात पोहचली आहे. ग्राहक संख्या दिवसेंदिवस विस्तारत आहे. कंपनीची सेवा देखील हळूहळू वाढू लागली आहे.
देशातील इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीशी तुलना केली असता जिओची ग्राहक संख्या अधिक आहे. जिओ नंतर एअरटेल या टेलिकॉम कंपनीचे सर्वाधिक ग्राहक असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या दोन्ही कंपन्यांमध्ये मोठे कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे.
हेच कारण आहे की आता या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन लॉन्च करत आहेत.
दरम्यान आज आपण जिओचा 395 रुपयाच्या प्लॅन विषयी जाणून घेणार आहोत. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना काय काय लाभ मिळतात याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत.
कसा आहे 395 रुपयाचा प्लॅन ?
जिओच्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 84 दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये एकूण 6 GB हाय-स्पीड डेटा देखील उपलब्ध आहे.
प्लॅनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 5G अमर्यादित डेटा देखील उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे 5G हँडसेट असेल तर तुम्ही या प्लानद्वारे तुमचा फोन रिचार्ज करू शकता.
ज्यांचा 5G मोबाईल असेल त्यांना या प्लॅन अंतर्गत अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे.
या प्लॅनने रिचार्ज केल्यानंतर 84 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.
यासोबत एकूण 1000 एसएमएसही उपलब्ध आहेत. Jio च्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना Jio च्या OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते, ज्यात Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud यांचा समावेश आहे.
मात्र या प्लॅनने जर तुम्हाला रिचार्ज करायचा असेल तर तुम्हाला जिओच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. किंवा मग तुम्हाला My Jio ॲप्लिकेशनवर जाऊन या प्लॅनने रिचार्ज करावा लागणार आहे.